२४ डिसेंबर साने गुरुजी : जयंती व रुग्णालय वर्धापनानिमित बाल आनंद महोत्सव व चित्रकार रणजीत वर्मा यांचे चित्र प्रदर्शन - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Tuesday, December 24, 2019

२४ डिसेंबर साने गुरुजी : जयंती व रुग्णालय वर्धापनानिमित बाल आनंद महोत्सव व चित्रकार रणजीत वर्मा यांचे चित्र प्रदर्शन




किनवट: 
साने गुरुजी जयंती व साने गुरुजी रुग्णालयाच्या २४ व्या वर्धापन दिन सोहळ्या निमित्त मंगळवारी (दि.२४) सकाळी १० वाजता इयत्ता चौथी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी "बाल आनंद महोत्सवाचे" आयोजन करण्यात  आले असून प्रसिद्ध चित्रकार रणजीत वर्मा यांच्या चित्रांचे भव्य प्रदर्शन भरविण्यात येणार आहे असे साने गुरुजी रुग्णालयाचे प्रमुख डाॅ.अशोक बेलखोडे यांनी सांगितले.
   महोत्सवाचे उद्घाटन उदगीर येथील ग्रंथमित्र दीपक  बलसुरकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई येथील पटकथाकार प्रकाश जाधव हे उपस्थित राहणार आहेत. रुग्णालयाच्या प्रांगणात गोदावरी अर्बन बँक पुरस्कृत होणा-या चित्र कला व रंगभरण स्पर्धेचे उद्घाटन उदगीर येथील अजयकुमार श्रीवास्तव हे करतील.
यानिमित्ताने  कठपुतली, कोलाज व हस्तकला, मातिकाम, संगीत , वादन, सुंदर लेखन,फेस पेंटिंग, विज्ञान व अंधश्रद्धा व बांबू कला यांची दालने उघडण्यात आली आहेत. उपस्थित रहाण्याचे आवाहन भारत जोडो युवा अकादमी व साने गुरुजी रुग्णालय परिवाराने केले आहे.

रणजीत वर्मा यांचे भव्य चित्र प्रदर्शन


कला क्षेत्रातील राज्य,राष्ट्रीय स्तरावरील अनेक पुरस्काराने सन्मानित प्रसिध्द चित्रकार तथा शिक्षक  रणजीत वर्मा ( माहूर ) यांच्या देशभर गाजलेल्या चित्रांचे भव्य प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. यापूर्वी त्यांच्या चित्रांचे  गुजरात, दिल्ली, मुंबई अशा मोठ्या शहरातील प्रख्यात कलादालनात प्रदर्शन मांडण्यात आले होते. त्यांच्या चित्रांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक पुरस्कार मिळाले आहेत. सर्वांच्या आग्रहाखातर दि.24 ते 26 डिसेंबर या कालावधीत सानेगुरुजी रुग्णालयात हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहणार आहे. तेव्हा सर्वांनी या चित्र प्रदर्शनाचा लाभ घ्यावा. असे आवाहन डॉ. अशोक बेलखोडे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News