मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निमंत्रणावरून त्यांच्या निवासस्थानी घेतली भेट ; 26 डिसेंबरच्या मुंबईतील आंदोलनाविषयी झाली चर्चा - ऍड. प्रकाश आंबेडकर - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Tuesday, December 24, 2019

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निमंत्रणावरून त्यांच्या निवासस्थानी घेतली भेट ; 26 डिसेंबरच्या मुंबईतील आंदोलनाविषयी झाली चर्चा - ऍड. प्रकाश आंबेडकर



मुंबई :
आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निमंत्रणावरून त्यांच्या निवासस्थानी त्यांच्यासोबत भेट झाली. 26 डिसेंबर रोजी मुंबईत होणाऱ्या एनआरसी-सीएए कायद्याविरोधी वंचित बहुजन आघाडी, समविचारी संघटनांच्यावतीने दादर येथे धरणा आंदोलनाचे आयोजन केले आहे. याविषयी  ठाकरे यांच्या समवेत या बैठकीत चर्चा झाली. अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड. बाळासाहेब उपाख्य प्रकाश आंबेडकर यांनी दिली.
               आंदोलन शांततेत पार पाडावे या संदर्भात बैठकीत चर्चा झाली. नागरिकत्व कायदा केवळ मुस्लिमांनाच लागू होतो हा भाजप-संघाचा प्रचार खोटा आहे. या कायद्यामुळे 40 टक्के हिंदू भरडले जाणार आहेत. शिवाय अन्य जातींनाही याचा फटका बसणार आहे,हे स्पष्ट केले. या कायद्यांचा विरोध करण्यासाठी हे आंदोलन करण्यात येतय.
               राज्यात डिटेन्शन कॅम्प उभारले जातेय हे मी तीन महिन्यांपूर्वी जनतेला, माध्यमांना सांगितले होते, त्याचीही माहिती आम्ही मुख्यमंत्र्यांना दिली. त्यासोबत अनेक मुद्द्यांवर बैठकीत चर्चा झाली. यावेळी धनराज वंजारी, डॉ.अरुण सावंत,आ.कपिल पाटील उपस्थित होते.


No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News