औरंगाबाद :
बुद्ध आणि कबिराच्या विचाराने भारावून गेलेल्या संजय उबाळे यांनी आपले नामकरण बुद्धप्रिय कबीर असे केले होते. या बुद्धप्रिय कबीर उर्फ संजय उबाळे ( ५४ वर्षे ) नुकतेच निधन झाले. त्यांचे पश्चात आई, आजी, बहिण व विहिणी असून त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. आंबेडकरी चळवळीतील सर्व कार्यकर्ते त्यांच्या स्मृतींना अभिवादन करीत आहेत.
फुले, शाहू, "आंबेडकरी विचाराचा एक कट्टर कार्यकर्ता, आंबेडकरी चळवळीचा आधारवड' असा शिक्का बुद्धप्रिय यांच्या कामावर होता. घरदार, संसार असं काही नव्हते. बुद्धप्रिय यांनी चळवळीला आपले आयुष्य समर्पित केले होते. आंबेडकरी आणि लाल सलाम चळवळीचा बुद्धप्रिय आजही खरा आधार होता. तो आधारवड आता सर्वांना सोडून गेला. त्यांना नाहीरेवाल्या कष्टकऱ्यांसाठी एक व्यापक चळवळ उभी करायची होती ; ते त्यांचे स्वप्न स्वप्नच राहिले. त्यांनी अनेकांमध्ये कार्यकर्ता निर्माण केल्याचे अनेक कार्यकर्ते त्यांचे मित्र खूप अभिमानाने सांगतात. अनेकजण त्यांचा निळा आणि लाल झेंडा खांद्यावर घेऊन त्यांची यात्रा पुढे नेतील. अशी अपेक्षा करूया. त्यांच्या पावन स्मृतींना सेक्युलर मुव्हमेंट व अखिल भारतीय बौद्ध उपासक संघाचे डॉक्टर अशोक गायकवाड, प्राध्यापक डॉक्टर अंबादास कांबळे, प्राध्यापक डॉक्टर पंजाब शेरे, ऍडव्होकेट मिलिंद सर्पे, प्राध्यापक डॉक्टर आनंद भालेराव, विनोद भरणे, उत्तम कानिंदे, गोकुळ भवरे, दिलीप भगत, प्रा.रविकांत सर्पे, प्रा. दिलीप पाटील, रमेश मुनेश्वर, भारतध्वज सर्पे, रुपेश मुनेश्वर, सुरेश पाटील आदिंनी आदरांजली वाहिली.
निवेदक न्यूजतर्फे त्यांना जय भीम..लाल सलाम..




No comments:
Post a Comment