किनवट :
जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर व सहायक जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांचे आदेशान्वये गरीब व गरजू व्यक्तींना स्वस्त दरात शिवभोजन उपलब्ध करुन देण्याकरिता शिवभोजन योजना राबवायची आहे त्या करिता ईच्छूकांनी सोमवारी ( दि.30 मार्च ) रोजी दुपारी 4 वाजता तहसील कार्यालयात अर्जासह स्वतः उपस्थित राहावे असे तहसिलदार नरेंद्र देशमुख यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
योजने अंतर्गत सुरु करण्यात येणाऱ्या भोजनालयात 2 चपात्या , 1 वाटी भाजी , 1 मुद भात व 1 वाटी वरण समाविष्ट असलेली जेवणाची थाळी रु 05 / - प्रति थाळी असेल . सदर थाळीची किंमत शहरी भागामध्ये प्रतीथाळी 50 / - व ग्रामीण भागामध्ये 35 / - इतकी राहील ग्राहकाकडून ' आलेल्या रु 05 / - एवढ्या रक्कमे व्यतिरिक्त उर्वरित रक्कम मा . जिल्हाधिकारी यांच्या मार्फत अनुदान म्हणून संबधीतांना वितरीत करण्यात येईल. या प्रमाणे किनवट तालुक्यातील भोजन अथवा मेस यापैकी सदर योजना राबविण्यास सक्षम असलेल्यांनी तहसिल कार्यालय किनवट येथे आज सोमवारी ( दि. 30/03/2020) रोजी दुपारी 04 : 00 वाजता अर्जासह उपस्थित राहावे . असे प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केले आहे.
या योजनेच्या निवड प्रक्रियेचे संपूर्ण अधिकार निवड समितीला राहतील . तालुकास्तरीय निवड समितीचे तहसिलदार अध्यक्ष, गट विकास अधिकारी सदस्य व मुख्याधिकारी सदस्य सचिव असतील.
सदर योजना राबविण्यासाठी पुढीलप्रमाणे अटी व शर्ती राहतील : सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर राज्यात प्रत्येक तालुक्याच्या मुख्यालयी व नगरपलिका क्षेत्रात किमान 1 भोजनालयसुरु करण्यात येईल . सदर भोजनालय वर्दळीच्या ठिकाणी असेल . हीभोजनालये दुपारी 11 . 00 ते 3 . 00 या कालावधीत कार्यरत राहतील. सदर भोजनालयात दुपारी 11 . 00 ते 3 . 00 या योजनेच्या लाभार्थ्यासाठी राखीव जागा ' उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी संबधितभोजनालय चालकाची असेल . यासाठी भोजनालयचालविण्यासाठी सदर मालकाकडे स्वताची पर्याप्त जागा असावी . भोजनालयात एका वेळी 25 व्यक्तीची जेवणासाठी बसण्याची व्यवस्था असेल .सदर भोजनालयात बाहेरचे जेवण घेऊन येण्यास व भोजनालयातील जेवण घेऊन जाण्यास सक्त मनाई असेल . शासकीयकर्मचान्याना तसेच ज्या ठिकाणी ही योजना राबविण्यातयेईल . तेथील आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांना सदर भोजनालयात सवलतीच्या दराने जेवण्यास सक्त मनाई असेल . कोणत्याही परिस्तिथतीत शिळे अथवा खराब झालेले अन्न ग्राहकांना पुरविण्यात येणार नाही याची दक्षता घेण्याची जबाबदारी संबधित संस्थेची राहील . कोणत्याही ग्राहकास सदर अन्नाचे सेवन केल्यामुळे विषबाधा होणार नाही याची दक्षता भोजनालय चालकांनी घ्यावी . प्रत्येक भोजनालयातील अन्नाचा दर्जा योग्य असल्याबाबत अन्न व औषध प्रशासनाकडून वेळोवेळी तपासणी करून घेऊन त्या प्रशासनाने दिलेले प्रमाणपत्र दर्शनी भागावर लावण्याची जबाबदारी भोजनालय चालकाची राहील . असे तहसिलदार नरेंद्र देशमुख यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे.




No comments:
Post a Comment