' निवेदक न्यूज ' ने प्रथम फोडली वाचा ; खा. हेमंतभाऊ पाटील यांनी भरविला घास : मॉरिशसमधील 'त्या' लेकरांनी मानले आभार - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Monday, March 30, 2020

' निवेदक न्यूज ' ने प्रथम फोडली वाचा ; खा. हेमंतभाऊ पाटील यांनी भरविला घास : मॉरिशसमधील 'त्या' लेकरांनी मानले आभार




किनवट :
कोरोना (कोव्हीड-19 ) च्या लॉकडाऊनमुळे मॉरिशसमध्ये अडकलेल्या व उपाशीपोटी असलेल्या आमच्या मुलांच्या जेवनाची व्यवस्था करावी किंवा त्यांना मायदेशी आणावे, अशी पालकाची विनंती या मथळ्याखाली बातमी सर्वप्रथम " निवेदक न्यूज यू ट्युब चॅनल " व " निवेदक न्यूज वेबपोर्टलने " जगासमोर मांडली.
यवढ्यावरच न थांबता हिंगोली लोकसभा मतदार संघाचे कार्यतत्पर खासदार हेमंतभाऊ पाटील यांच्याकडे पालकाची कैफियत मांडली. तेव्हा त्यांनी तातडीने पावले उचलून मॉरिशसमधील त्या भुकेल्या लेकरांच्या भोजनाची व्यवस्था केली. ही खबर ' त्या ' मुलांनी आपल्या आई वडीलांना देताच ; त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू आले. पालकांनी त्यांचे मनस्वी आभार मानले.

          सविस्तर वृत्त असे की, येथील श्रेयश बळीराम राठोड ( वय 20 वर्षे ) हा हॉटेल मॅनेजमेंटच्या इंटरशिपसाठी डिसेंबर 2019 मध्ये मॉरिशेस मध्ये गेला आहे. कोरोना ( कोव्हीड -19 ) च्या प्रादुर्भावाने तिथेही लॉकडाऊन आहे.विमान वाहतूक बंद झाली. त्यामुळे मायदेशी येता येईना. जवळचे राशन व गॅस संपल्याने उपाशीपोटी राहावे लागत आहे.
             त्याच्या सोबत कोल्हापूर, पुणे, ठाणेचे प्रत्येकी एक व मुंबईचे सहा विद्यार्थी आहेत. असे एकूण दहा जन आहेत. ती अशी : विद्यार्थ्यांची नावे ( तेथील मोबाईल क्रमांक ) :  अनस अब्दुलमाजीद खान (+ 230 58173584 ) , अप्सर अली मन्वरुल हक शेख ,नंबर नाही, मुदस्सर इम्रान मोमीन (+230 58173460 ), रिजवान अब्दुल हमीद अन्सारी, सर्व मुंबई, समर्थ संतोष शिंदे,
मुगेझ मेहबूब शेख, ठाणे, निखिल विवेक पुरंदरे (+230 5817 2278 ), ऋषिकेश दीपक हबीब (+91 8605588317 ), कोल्हापूर, हृतिक राजू हुलावळे ( +230 58173474 ), पुणे व श्रेयश बळीराम राठोड (+230 58273465 ), किनवट, नांदेड
            हे दहा विद्यार्थी मॉरसेलमेंट सायरन व्यूह, प्लॉट नं. १७, पॉईटेक्स अक्स पिमेंटस, मॉरिशस येथे आहेत. तेथील उपाशीपोटी राहणाऱ्या या मुलांच्या जेवनाची व्यवस्था करावी किंवा त्यांना मायदेशी आणावे अशी विनंती श्रेयसचे वडील बळीराम राठोड यांनी "निवेदक न्यूज " च्या माध्यमातून केली होती. ही विनंती प्रा.सुरेश कटकमवार यांचे मार्फत हिंगोली लोकसभा मतदार संघाचे खासदार हेमंतभाऊ पाटील यांचेकडे पोहचवली. त्यांचे येथील संपर्क प्रमुख सुनिल गरड यांनीही पाठपुरावा केला.
            त्यानंतर कार्यतत्पर खासदार हेमंतभाऊ पाटील यांनी तातडीने परराष्ट्र मंत्रालयाच्या सचिवाशी संपर्क साधला. आंतराष्ट्रीय विमानसेवा बंद असल्याने त्यांना मायदेशी आणने शक्य नाही. तसेच तेथील भारतीय दुतावास रिकामे केल्याने तिथे वॉचमन शिवाय कोणीही नाही असे त्यांना कळले. तेव्हा त्यांनी ही बाब मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या कानी सुध्दा घातली. मग त्यांनी मॉरिशसमध्ये असलेले उद्योगपती मित्र अमित सूचावन यांचेशी संपर्क साधून या भुकेल्या मुलांना आवश्यक ते अन्न धान्य उपलब्ध करून देण्याची विनंती केली. त्यांनी तातडीने त्या मुलांपर्यंत जाऊन आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या तसेच तिथे असेपर्यंत त्यांना सर्व प्रकारे सहकार्य करण्याची ग्वाही दिली.
            मुलांनी उड्या मारत व्हिडीओ कॉलिंगद्वारे आपल्या आईवडिलांना हा सुखद समाचार दिला. जिथे सरकारची यंत्रणा पोहचत नाही तिथे आपल्या मैत्रीने 'या ' लेकरांना घास भरविला या बद्दल कार्यकुशल खासदार हेमंतभाऊ पाटील यांचे त्यांनी व त्यांच्या पालकांनी मनस्वी आभार मानले आहेत.
            त्याचबरोबर पालकाच्या टाहोला "निवेदक न्यूज" ने वाचा फोडल्याबद्दल निवेदक न्यूजचे संपादक निवेदक उत्तम कानिंदे यांनाही त्यांनी धन्यवाद दिले आहेत.
    

मा.खा.हेमंत पाटील यांचे शतशः आभार

माझा मुलगा श्रेयस राठोड हा हॉटेल मॅनेजमेंटच्या इंटरशीपसाठी मॉरिशस येथे गेला आहे आणि कोरोनाने तिथे लॉकडाऊन झाले. राशन व गॅस संपल्याने त्याचासह मित्रांवर उपासमारीची वेळ आली होती. ही गंभीर बाब सर्व जनतेच्या हाकेला ओ देणारे हिंगोली लोकसभा मतदार संघाचे लाडके खासदार मा.हेमंतभाऊ पाटील यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यांनी जातीने लक्ष देऊन तेथे माझ्या मुलांसह सर्व विध्यार्थ्यांची पुर्णतः सोय केली. पालक या नात्याने साहेबांचा शतशः ऋणी आहे, साहेबांचे मनस्वी त्रिवार आभार व्यक्त करतो.
        तसेच माझी कैफीयत "निवेदक न्यूज " ने सर्वांसह खासदार साहेबांसमोर मांडली. त्याचबरोबर प्रा.सुरेश कटकमवार व संपर्क प्रमुख सुनिल गरड यांनी पाठपुरावा केला. त्याबद्दल मनस्वी धन्यवाद !
 -बळीराम राठोड,
रा. साईनगर, किनवट
      

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News