*लाडकी बहीण योजनेत फसवणूक करणाऱ्यांवर सक्त कारवाई करा* *जिल्हाधिकाऱ्यांचे पोलिसांना निर्देश* - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Monday, September 30, 2024

*लाडकी बहीण योजनेत फसवणूक करणाऱ्यांवर सक्त कारवाई करा* *जिल्हाधिकाऱ्यांचे पोलिसांना निर्देश*




नांदेड ता. 30 : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी या योजनेतील पैसे दुसऱ्याच पुरुषांचे आधार कार्ड व बँक अकाउंट वापरून फसवणूक करणाऱ्या सीएससी केंद्रचालकावर कडक कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले आहेत. सोबतच अशा प्रकारची कुठे फसवणूक झाली तर नाही ना याबाबतही चौकशी करण्याचे त्यांनी निर्देश दिले आहेत.


नांदेड जिल्ह्यामध्ये हदगाव तालुक्यातील मनाठा गावात ही फसवणूक झाल्याचे पुढे आले आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या लोकप्रिय योजनेतील महिलांच्या हक्काचे पैसे पुरूषांच्या आधार लिंक असणाऱ्या खात्यावर  परस्पर लाटल्याचा प्रकार जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील मनाठा या ठिकाणी उघडकीस आला आहे. 


मनाठा येथील सचिन सीएससी सेंटर या सीएससी सेंटरच्या चालकाने महिला लाभार्थ्यांचे अर्ज भरून घेताना इतर पुरूषांकडून आधारकार्ड व ते लिंक असणारे बँक अकाऊंट अपलोड केले.पुरूषांच्या आधार कार्डवर  महिलांचे फोटो बनावट पद्धतीने अपलोड केले. महिलांचे नाव व आधारकार्डवर महिलांचे फोटो असल्यामुळे छाननीमध्ये सदरचा अर्ज महिलांनीच भरलेला आहे असे दिसून आले .परंतु आधार क्रमांक व त्याला लिंक असलेल्या बँक खाते हे इतर पुरुषांचे होते. त्यामुळे महिलांच्या खातात जमा होणारा पैसा या पुरुषांच्या खात्यावर आला.


ज्यांच्या खात्यात हे पैसे आले त्या पुरूषांनाही याची  कल्पना नव्हती. नंतर त्यांचा अंगठा घेऊन सदरचा पैसा काढून घेण्याचा प्रयत्न सदरच्या सीएससी केंद्र चालकाने केला. तेव्हा हा प्रकार उघडकीस आला.


  या प्रकारानंतर  सदरच्या केंद्रचालकावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे अशा प्रकारचे इतरत्र कुठे गडबड करण्यात आलेली आहे का..? याबाबतही चौकशी सुरू करण्यात आलेली आहे. महिला लाभार्थ्यांचे नाव व फोटो वापरून अशाप्रकारे बनवाबनवी करणाऱ्या या केंद्रचालकांवरती कडक कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News