बेला मंडळ /आदिलाबाद/तेलंगणा (गजानन खोब्रागडे) : बेला मंडळातील कोडगुरु गावात आज सोमवारी (ता.30 सप्टेंबर 2024) सखी केंद्र आणि महिला सक्षमीकरण यांच्या संयुक्त विद्यमाने (आयसीडीएस सेक्टर ) अंगणवाडी क्षेत्र व जिल्हा परिषद हायस्कूल संगिदी जन जागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
जनजागृती कार्यक्रमात केंद्राच्या प्रशासक सरस्वती व महिला सक्षमीकरण जिल्हा अभियान समन्वयक यशोदा यांची भाषणे झाली. घरगुती हिंसाचार कायदा, कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ कायदा, बालविवाह कायदा, बेटी बचाओ बेटी पढाओ, सुकन्या समृद्धी योजना, मिशन शक्ती योजना याविषयी जनजागृती करणाऱ्या सखी केंद्रातर्फे पाच प्रकारच्या सेवा दिल्या जातात.
आपत्कालीन परिस्थितीत 181 1098 1930 100 हा टोल फ्री क्रमांक डायल करावा असेही यावेळी सांगितले. या जनजागृती कार्यक्रमात आयसीडीएस पर्यवेक्षिका सुजाता, अंगणवाडी सेविका, शाळेचे मुख्याध्यापक एच.एम.सुदर्शन, शिक्षक व विद्यार्थी सहभागी झाले होते.





No comments:
Post a Comment