काळ्या फळ्यावर पांढ-या खडूने--- - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Sunday, December 22, 2019

काळ्या फळ्यावर पांढ-या खडूने---



काळ्या फळ्यावर पांढ-या खडूने---


  प्रा.नंदू वानखडे
 


'काळ्या फळ्यावर
पांढ-या खडूने लिहिलेला
सुविचार
आपला छान आहे .

'आपण सारे एकाच परमेश्वराची
लेकरे आहोत..
संविधान आमचा
प्राण आहे.."

मग
मी हिंदू ,तो ईसाई
ही कुणाच्या डोक्यातली
घाण आहे..?

तुमचंही रक्त लाल आहे..
आमचंही रक्त लाल आहे..
मग
दंगली पेटतात
डोकी फुटतात
ही कुणाची आगलावी
चाल आहे ?

धर्माची व्याख्या माहित नाही.
पण
धर्माचं मोठं वेड आहे .
आणि
दगडाच्या देवावरून
माणसा- माणसात
वाढतच जाणारं
तेढ आहे...!

धर्मशास्त्रे वाचली नाहीत
मात्र डोक्यात त्याचंच
खुळ आहे.
माणसा माणसांत
भेद करणारं
विषमतेचं मूळ आहे ...!



--प्रा नंदू वानखडे 
मुंगळा ता.मालेगाव जि.वाशिम
9423650468

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News