लोहा :
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भिमलातांडा येथे हंगामी अनिवासी वसतीगृहाचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले. उद्घाटक म्हणून लोहा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी रवींद्र सोनटक्के तर प्रमुख पाहुणे म्हणुन केंद्रीय मुख्याध्यापक तथा महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष जी.एस.मंगनाळे , केंद्रप्रमुख बाबुराव फसमल्ले , रा. आं.नगर मुख्याध्यापक एम.डी.सिरसाट ,गट साधन केंद्राचे विषय तज्ज्ञ कस्तुरे यांची उपस्थिती होती.
याप्रसंगी गटशिक्षणाधिकारी रवींद्र सोनटक्के यांनी मार्गदर्शन केले. या वसतीगृहामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेमध्ये वाढ होईल व विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात राहतील असे त्यांनी मत प्रतिपादन केले. ग्रामपंचायत सदस्य वसंतराव जाधव , वस्तीगृह व्यवस्थापक अशोक राठोड, दिगंबर राठोड, संजय चव्हाण , किरण जाधव, रघुनाथ पवार, नारायण चव्हाण, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अनिल राठोड , मुख्याध्यापक इलियास सय्यद ,मनोहर शितळे , राहुल कुंडलवाडीकर, बालाजी शिंदे आदींनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.




No comments:
Post a Comment