स्वच्छता कामगाराचा मुलगा झाला न्यायाधीश - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Monday, December 23, 2019

स्वच्छता कामगाराचा मुलगा झाला न्यायाधीश




सोलापूर : 
येथील रमाबाई आंबेडकरनगरमधील रहिवाशी महापालिकेत स्वच्छता कर्मचारी असलेल्या आई वडीलाचा मुलगा न्यायाधीश झाल्याने सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.
           आपला मुलगा न्यायाधीश व्हावा ही स्वच्छता कर्मचारी असलेल्या वडीलांची मनोमन ईच्छा होती. महापालिका शाळेत प्राथमिक शिक्षण घेत असताना लहानपणापासूनच आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करणाऱ्याचा ध्यास घेतलेल्या या युवकाचे नाव आहे कुणाल कुमार वाघमारे.
           भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदर्श मानून रात्रंदिवस अभ्यास केला. संकटांना भेदून, आर्थिक परिस्थितीवर मात करत, बुद्धी सामर्थ्याच्या जोरावर एका स्वच्छता कर्मचाऱ्याचा मुलगा न्यायाधीश बनला. हा सर्वांसमोर एक नवा आदर्श आहे.
         महापालिका शाळा क्रमांक दोन आणि शाळा क्रमांक २१ मध्ये प्राथमिक शिक्षण तर ' दयानंद ' मध्ये महाविद्यालयीन तर भाई छन्नुसिंह चंदेले महाविद्यालयातून एमएसडब्ल्यूचे शिक्षण कुणाल वाघमारे यांनी पूर्ण केले . त्यानंतर दयानंद विधी महाविद्यालयातून एल . एल . बी . व एल . एल . एम . चे शिक्षण पूर्ण केले . आई वडिलांच्या स्वप्नाच्या दिशेने वाटचाल करीत कुणाल वाघमारे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवित न्यायाधीश होण्याचा बहुमान मिळविला .
          रमाबाई आंबेडकरनगर येथील रहिवासी वडील कुमार आणि आई नंदा या सोलापूर महानगरपालिकेतील स्वच्छता कर्मचारी . त्यांनी स्वतःच्या पोटाला चिमटा घेऊन मुलाच्या स्वप्नाला साथ दिली . मुलाला शिक्षणात कोणत्याच गोष्टी कमी पडू दिल्या नाहीत . त्याची जाणीव ठेवून कुणालने यश मिळवल्याने आई -वडिलांना आनंदाश्रू अनावर झाले होते . कुणाल वाघमारे २०० पैकी १५८ गुण मिळवत महाराष्ट्रातून दहाव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले . अनुसूचित जाती प्रवर्गात ते पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत . त्यांची दिवाणी न्यायाधीश ( क ) स्तर व प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी म्हणून निवड झाली आहे .
         

बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनीच मुलाखत 

         
          महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या दिवाणी न्यायाधीश ( क ) स्तर व प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी या पदासाठी कुणाल वाघमारे यांनी ७ एप्रिल २०१९ ला पूर्व परीक्षा तर मुख्य परीक्षा १ सप्टेंबरला ६ डिसेंबरला मुलाखत दिली . न्यायाधीशपदी पोचण्यासाठी कुणाल यांनी डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला होता . त्यांच्या महापरिनिर्वाण दिनीच त्यांनी यशस्वी मुलाखत दिली हा योगायोगच म्हणावा लागेल . या यशाबद्दल रमाकांत नडगेरी , अशोक शिवशरण , अनिरुद्ध वाघमारे , धर्मराज हदिमणी , अनिल गायकवाड , बनसोडे यांनी अभिनंदन केले .



        डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांना आदर्श मानून लहानपणापासून न्यायाधीश होण्याचे मी स्वप्न पाहत होतो . दररोज रात्रंदिवस अभ्यास घरीच करत . संघर्षाशिवाय यश कधीच मिळत नसते . आज यशाचा दरवाजा उघडला . स्वप्न पाहण्यासाठी कमी वेळ आणि पूर्ण करण्यासाठी जास्त वेळ दिला . माझ्या यशात आई - वडील , बहिणी व पत्नीचे खूप मोठे योगदान आहे . योग्य न्यायदान करण्याचा प्रयत्न मी करीन . 

-ऍड . कुणाल वाघमारे , सोलापूर 


No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News