साने गुरूजी जयंती व साने गुरुजी रुग्णालयाच्या वर्धापन दिनानिमीत्त 'बाल आनंद मेळाव्याच्या ' माध्यमातून वंचितांना दिला अभिव्यक्ती सादरीकरणास कलामंच - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Friday, December 27, 2019

साने गुरूजी जयंती व साने गुरुजी रुग्णालयाच्या वर्धापन दिनानिमीत्त 'बाल आनंद मेळाव्याच्या ' माध्यमातून वंचितांना दिला अभिव्यक्ती सादरीकरणास कलामंच



किनवट : 
 साने गुरूजी जयंती व साने गुरुजी रुग्णालयाच्या वर्धापन दिना निमीत्त बाल आनंद मेळाव्याचे आयोजन मंगळवारी ( ता.२४  ) करण्यात आले होते. 
             

            कार्यक्रमाची सुरूवात प्रा . रामप्रसाद तौर यांच्या हस्ते ध्वजवंदन व राष्ट्रगीतानं झाली , तेजस्विनी उईक व वेदीका बेलखोडे यांनी एकता गीत सादर केले . साने गुरुर्जीच्या प्रतीमचे पुजन करून सहभागी विद्यार्थी यांच्यातुन आज ज्यांचा वाढदिवस होता त्या अबुझर शेख महेमूद या इयत्ता आठ्वीतील विद्यार्थ्याला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान दिले. महोत्सवाचे उद्घाटन प्रसिद्ध कथाकार दीपक बलसुरकर यांच्या हस्ते करण्यात आले . या कार्यक्रमात हॅलो मेडीकल फाऊंडेशचे सदस्य तथा प्रसिध्द भूलतज्ज्ञ डॉ . मारोती गायकवाड , प्रसिध्द चित्रकार रणजीत वर्मा , चित्रकार अजयकुमार श्रीवास्तव , प्रा . किशनराव किनवटकर , गिरीष नेम्मानीवार , के . मुर्ती यांची प्रमुख उपस्थिती होती .


             साने गुरुजी - बाबा आमटे संयुक्त जयंती व साने गुरुजी रुग्णालयाचा वर्धापन दिनानिमीत्त किनवट येथ तीन दिवसीय महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे . यात विविध कार्यक्रम होणार असुन बाल आनंद मेळाव्या निमीत्त गोदावरी अर्बन बँक पुरस्कृत भव्य चित्रकला व रंगभरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं होतं.



प्रसिध्द चित्रका रणजीत वर्मा व अजयकुमार श्रीवास्वत यांच्या हस्ते चित्र काढुन स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आलं . याच बरोबर हस्तकला . कोलाज , मातीकाम , संगीत , सुंदर लेखन , कठपुतली , बांबुकाम , टॅटु , फेसपेंटींग, वाचन , विज्ञान प्रयोग अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन आठ दालनात करण्यात आले होते .


          कथाकथनकार बलसुरकर यांनी कथाकथन व प्रेरणागीत सादर केले . जयंती निमीत्त रणजीत वर्मा यांनी काढलेल्या चित्राचं भव्य प्रदर्शन साने गुरुजी रुग्णालयात भरविण्यात आले . या चित्रकला स्पर्धेत किनवट शहरातील व परीसरातील विविध शाळांमधील एक हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला . या सोहळ्यासाठी अजय श्रीवास्तव , प्रकाश जाधव , कविता मानकर जाधव , निसर्ग सेवा समिती वर्धाचे मुरलीधर बेलखोडे व किनवट शहरातील विविध शाळांतील शिक्षक , विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते .

कविता जांशी नांदेड , मकरंद पाटील देगलुर , बालाजी सुंकावार , देगलुर व माधव गायकवाड यांनी साने गुरूजी रूग्णालयात काढलेली रांगोळी सर्वांचे लक्ष वेधत होती . उत्तम कानिंदे यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व  डॉ . अशोक बेलखोडे यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रुग्णसहायक - सहायीका प्रशिक्षणाचे प्रशिक्षणार्थी , साने गुरुजी रुग्णालय परिवारातील सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले . या दालनामध्ये कला शिक्षक शिवराज बामणीकर , बालाजी इंदूरकर , संतोष ताडुरकर , प्रा . शिवशक्ती गांडसलवार यांनी विद्यार्थ्यांना प्रात्याक्षिक करून दाखवत प्रशिक्षण दिले.
        सायंकाळी सांस्कृतीक कार्यक्रमात प्रसिध्द अभिनेत्री कविता मानकर यांनी मी सावित्री बोलतेय हा एकपात्री प्रयोग सादर केला , विविध शाळकरी मुलांनी तबला वादन , नाटीका व नृत्य सादर केले या . कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ज्ञानेश्वर उईके व निलेश भिलवंडीकर यांनी केले. प्रेक्षक म्हणून आलेला पालावरील पहिलीतील शिवा जाधव मंचाजवळ घुटमळू लागला. फोटोग्राफरने अनेकदा त्याला बाजूला केले तरी तो काही हटेचना. या वंचित घटकातील मुलाला स्टेजवर नृत्य करायची संधी दिली तेव्हा फाटक्या -तुटक्या मळकट कपडयातील त्या हिरोने भन्नाट नृत्य करून सर्वांची मने जिंकली. हे या महोत्सवाचं वैशिष्ट्ये ठरलं. अशा प्रकारे साने गुरूजी जयंती व साने गुरुजी रुग्णालयाच्या वर्धापन दिनानिमीत्त 'बाल आनंद मेळाव्याच्या ' माध्यमातून वंचितांना  अभिव्यक्ती सादरीकरणास कलामंच उपलब्ध करून देण्यात आला.


No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News