किनवट :
साने गुरुजी जयंती व साने गरुजी रुग्णालयाच्या २४ व्या वर्धापन दिन सोहळ्यादरम्यान किनवट येथे आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा संपन्न झाली.
साने गुरुजी जयंती व साने गुरुजी रुग्णालयाच्या २४ व्या वर्धापन दिनानिमीत्त सुरु असलेल्या तीन दिवसिय सोहळ्याच्या दुसऱ्या दिवशी महाविद्यालयीन विद्यार्थी - विद्यार्थीनिंसाठी आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा घेण्यात आली. साने गुरुजी रुग्णालयाच्या प्रांगणात पार पडलेल्या या कार्यशाळेचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना विभाग, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड व भारत जोडो युवा अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते .
कार्यशाळेत नांदेड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाचे मास्टर ट्रेनर डॉ . अनिल रुईकर व रमेश कदम , किनवट तहसिल कार्यालयातील प्रशिक्षक हिवाळकर , राष्ट्रीय सेवा योजनेचे विभागीय समन्वयक डॉ . पंजाब शेरे , भारत जोडो अकादमीचे अध्यक्ष डॉ . अशोक बेलखोडे यांनी आपत्ती व्यवस्थापन या विषयावर प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले . यावेळी साने गुरुजी रुग्णालयातील कार्डियाक व इतर अंबुलन्स बद्दल व्यवस्थापक संजय बोलेनवार आणि चालक संदिप कांबळे यांनी तर नगर परिषदेतील अग्नीशमनचे वाहनाबद्दल सटवाजी डोखळे आणि रविचंद्र सुकणीवार यांनी मार्गदर्शन केले . कार्यशाळेत सरस्वती विद्या मंदिर महाविद्यालय , किनवट , बळीराम पाटील महाविद्यालय , किनवट , महाराष्ट्र कॉम्पीटीशन अकॅडमी किनवट , साने गुरुजी रुग्णालयातील रुग्णसहायक/ सहायिका प्रशिक्षण , किनवट , दत्त महाविद्यालय , हदगाव , हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालय , हिमायतनगर , साने गुरुजी महाविद्यालय , इस्लापुर , रेणुकादेवी महाविद्यालय , माहूर आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ , नांदेड येथील ५५ विद्यार्थी व ६९ विद्यार्थीनी असे एकूण १२४ विद्यार्थी सहभागी झाले होते . डॉ . सुनिल व्यवहारे सूत्रसंचालन यांनी केले. कार्यक्रमास किनवट शहरातील प्राध्यापक, शिक्षक, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते .




No comments:
Post a Comment