सारखणी येथे नव्याने प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करण्याची आमदार भीमराव केराम यांची मागणी - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Sunday, April 12, 2020

सारखणी येथे नव्याने प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करण्याची आमदार भीमराव केराम यांची मागणी



किनवट :
किनवट व माहूर तालुक्याचे मध्यवर्ती व सोईचे ठिकाण असल्याच्या पार्श्वभुमिवर सारखणी येथे नव्याने प्राथमिक आरोग्य केंद्रास मंजूरी देवून परिसरातील नागरीकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार भीमराव केराम यांनी आरोग्य मंत्र्यांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
             महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री ना. राजेश टोपे यांना दिलेल्या लेखी निवेदनात आ. केराम यांनी म्हटले आहे की, सारखणी हे ठिकाण किनवट माहूर तालुक्याचे मध्यवर्ती ठिकाण असून या गावास अवती भवती सुमारे २५ ते ३० खेडेगाव जोडलेले आहेत. त्यामुळे येथे विविध कामांसाठी परिसरातील असंख्य नागरीक दैनंदिन येत असतात. परंतू दोन्ही तालुक्यातील सोईचे ठिकाण असूनही येथील व परिसरातील नागरीकांना वैद्यकीय सोईसुविधांसाठी मात्र इतरत्र जावे लागते. त्यामुळे नागरीकांची वैद्यकीय सुविधांसाठी प्रचंड हेळसांड होत आहे. त्यामुळे येथे नव्याने प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करून या भागातील जनतेस आरोग्य विषयक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार भीमराव केराम यांनी आरोग्य मंत्र्यांकडे केली आहे.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News