नांदेड जिल्ह्यात आज पाच रुग्णांची भर : नऊ रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Saturday, May 30, 2020

नांदेड जिल्ह्यात आज पाच रुग्णांची भर : नऊ रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी


नांदेड  : नांदेड जिल्ह्यात आज दिनांक 29 मे, 2020 रोजी सांयकाळी  5  वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या 113 व्यक्तींच्या तपासणी अहवालापैकी 108 निगेटिव्ह अहवाल प्राप्त झाले आहेत. यात 5 नवीन रुग्ण पॉझिटिव्ह आल्यामुळे जिल्ह्यातील रुग्णसंख्या ही 143 झाली आहे. या रुग्णावर औषधोपचार सुरु असून त्यांची प्रकृती सद्यस्थितीत स्थिर आहे. 
जिल्ह्यात आज एनआरआय यात्री निवास कोविड सेंटर येथील 8 रुग्ण, उपजिल्हा रुग्णालय मुखेड येथील 1 रुग्ण असे एकूण 9 रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. आतापर्यंत 143 पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 99 रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. उर्वरित 36 रुग्णांवर औषधोपचार चालू असून त्यातील 2 स्त्री रुग्ण वय वर्षे 52 व 55 यांची प्रकृती गंभीर आहे. 
          आज सांयकाळी 5-00 पर्यंत आढळलेले 5 पॉझिटिव्ह रुग्ण हे पुढील भागातील आहेत. मिल्लत नगर भागातील 32 वर्षाचा 1 पुरुष रुग्ण, लोहार गल्ली भागातील 28 वर्षे वयाचा 1 पुरुष रुग्ण, मुखेड येथील गोळी गल्ली येथील 40 वर्ष वयाची 1 स्त्री रुग्ण व कळमनुरी जि. हिंगोली येथील 38 वर्ष वयाचा 1 पुरुष रुग्ण तर 35 वय वर्षाची 1 स्त्री रुग्ण यांचा 5 रुग्णात समावेश आहे. यापैकी 4 रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर औषधोपचार सुरु आहेत. मुखेड येथील एका महिला रुग्णाचा डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय , नांदेड येथे मृत्यू झाला आहे. 

कोरोना संशयीत व कोविड रुग्णांची संक्षीप्त माहिती पुढील प्रमाणे आहे.
 सर्वेक्षण- 1 लाख 38 हजार 466, 
 घेतलेले स्वॅब 3 हजार 751, 
 निगेटिव्ह स्वॅब 3 हजार 238, 
 आज रोजी पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 05, एकुण पॉझिटिव्ह रुग्ण 143, 
 स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या 143, 
 स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या 14, 
 मृत्यू संख्या 8, 
 रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या 99, 
रुग्णालयात उपचार घेत असलेले रुग्ण 36, 
स्वॅब तपासणी चालू रुग्ण संख्या 209 
 एवढी आहे.
           दिनांक 28 मे  रोजी पाठविण्यात आलेल्या 108 स्वॅब तपासणी अहवाल रात्री उशिरा पर्यंत प्राप्त होतील. ‍आज 29 मे  रोजी 101 रुग्णांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यांचे अहवाल उद्या संध्याकाळपर्यंत प्राप्त होतील.
एकुण 143 रुग्णांपैकी 8 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे व 99 रुग्ण हे बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. उपचार घेत असलेल्या 36 रुग्णांपैकी 09 रुग्ण हे डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय नांदेड . पंजाब भवन कोवीड केअर सेंटर, यात्री निवास कोवीड केअर सेंटर येथे 14 रुग्ण, उपजिल्हा रुग्णालय मुखेड येथे 4, ग्रामीण रुग्णालय भोकर येथे 1 रुग्ण व ग्रामीण रुग्णालय उमरी येथे 4 रुग्ण, ग्रामीण रुग्णालय, माहूर येथे 1 रुग्ण व उपजिल्हा रुग्णालय गोंकुदा येथे 1 रुग्ण असून 2 रुग्ण मुंबई येथे संदर्भित करण्यात आले आहेत.  सर्व रुग्णांवर औषध उपचार सुरु असून त्यांची प्रकृती सद्य:स्थितीत स्थिर आहे.
जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये असे आवाहन नांदेडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे. तसेच सर्व जनतेने आपल्या मोबाईलवर “आरोग्य सेतू ऍप” डाऊनलोड करुन घ्यावे जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ऍप सतर्क करेल असे डॉ. भोसीकर यांनी स्पष्ट करुन प्रशासनास जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. 

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News