शिवशक्तीनगर ( घोगरवाडी ) रस्त्याचे काम लवकरच मार्गी लागणार -सहाय्यक जिल्हाधिकारी अभिनव गोयल - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Friday, May 29, 2020

शिवशक्तीनगर ( घोगरवाडी ) रस्त्याचे काम लवकरच मार्गी लागणार -सहाय्यक जिल्हाधिकारी अभिनव गोयल



किनवट : " शिवशक्तीनगर  ( घोगरवाडी ) येथील गरोदर मातेस प्रसुतीसाठी रुग्णालयात जाण्याकरिता बैलगाडीचा आधार घ्यावा लागला "  वृत्ताची दखल घेत संबंधित सर्व विभागाची बैठक घेऊन प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी सदरील गावच्या रस्त्याचा मार्ग मोकळा केला आहे . 
              याबाबत सविस्तर वृत्त असे की , शिवशक्तीनगर- ( घोगरवाडी ) येथे प्रसुतीसाठी माहेरी आलेल्या एका महिलेस मंगळवारी (ता. २६ ) प्रसुती वेदना सुरु झाल्याचा प्राथमिक आरोग्य केंद्र बोधडी ( बुद्रुक) येथे सकाळी सात वाजता भ्रमणध्वनीद्वारे संदेश आल्याने शिवशक्तीनगर ( घोगरवाडी ) येथे रुग्णवाहीका सकाळी आठ वाजता पोहचली . परंतु एक कि.मी. अंतर पक्या रस्त्याअभावी रुग्णवाहीका महिलेच्या घरापर्यंत जाऊ शकत नव्हती . त्यामुळे बैलगाडीने गरोदर मातेस रुणवाहीकेपर्यंत आणण्यात आले . त्यावेळी आरोग्य कर्मचारी तिथे हजर होते . त्यांना उपजिल्हा रुग्णालयात प्रविष्ठ केले . तिथे बुधवारी (ता.२७ ) सकाळी १०.०० वाजता स्वाभाविक प्रसुती झाली असुन तीन कि.ग्रॅ . वजनाचे बालक जन्मास आले . माता व बालक यांची प्रकृती चांगली आहे . 
              याअनुषंगाने वृत्ताची दखल घेत शुक्रवारी (ता .२९ ) सकाळी ११.०० वाजता प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी आपल्या दालनात सर्व संबंधित विभागाचे अधिकारी यांची तातडीची बैठक घेतली . आरोग्य , वन व बांधकाम विभागाचा आढावा घेऊन आवश्यक त्या सूचना दिल्या . आदिवासी विकास विभागामार्फत पाच रुग्णवाहीका , औषधी , प्राथमिक आरोग्य केंद्र , उपकेंद्र इमारत बांधकाम व दुरुस्ती आणि रस्ते विकासासाठी भरपुर निधी देण्यात आला आहे . तेव्हा या निधीचा पुरेपुर विनियोग करुन अतिदुर्गम वाडी - वस्ती , कोलामपोड पर्यंत आरोग्यासह सर्व सोयी - सुविधा तातडीने उपलब्ध करुन द्याव्या . असे त्यांनी सांगितले .उपस्थित सर्व यंत्रणांनी तातडीने याची दखल घेऊन प्रलंबित कामे त्वरीत पुर्ण करण्याची ग्वाही दिल्याने सदरील गावच्या रस्त्त्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे .

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News