ऑनलाईन व्यवहारासाठीच्या ' किनवट कार्ट ' ऍपचे झाले लोकार्पण - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Saturday, May 30, 2020

ऑनलाईन व्यवहारासाठीच्या ' किनवट कार्ट ' ऍपचे झाले लोकार्पण



किनवट : कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर आदिवासी दुर्गम भागात तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नगर परिषदेच्या वतिने  ऑनलाईन व्यवहाराची ची सुविधा उपलब्ध होने ही चांगली बाब आहे.  ह्या ऍपचा उपयोग नागरिकांनी केल्यास ही किनवटच्या उज्ज्वल भविष्याची नांदी ठरेल आणि सेटट्राइब आयटी सोल्युशन्सच्या माध्यमातून याची निर्मीती झाल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा कल माहिती तंत्रज्ञानाकडे वळेल असे प्रतिपादन आमदार भीमराव केराम यांनी केले. 
             ते किनवट नगर परिषदेच्या वतिने तयार करण्यात आलेल्या ‘किनवट कार्ट’ ह्या ऑनलाइन शॉपिंग अॅपच्या लोकार्पण प्रसंगी बोलत होते. यावेळी  खासदार हेमंत पाटील, सहायक जिल्हाधिकारी अभिनव गोयल, नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, मुख्याधिकारी निलेश सुंकेवार, उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार नाईक, उपनगराध्यक्ष अजय चाडावार, व्यापारी संघटनेचे दिनकर चाडावार उपस्थित होते.
              किनवट नगर परिषदेच्या वतीने  व्यापारी व ग्राहकांच्या सुविधेसाठी निर्मिलेल्या ‘किनवट कार्ट’ या ऐपचे लोकार्पण आमदार भीमराव केराम व सहायक जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते करण्यात आले.
              आमदार केराम पुढे म्हणाले, कोरोनामुळे आता नागरिक घराबाहेर पडायला घाबरत आहेत. अशा परिस्थितीत किनवट कार्ट ऍप मुळे लोकांना घरबसल्या किराणा ऑर्डर करता येण्याची सुविधा आता उपलब्ध होणार आहे. याचा नागरिकांनी जास्तीत जास्त उपयोग करावा व व्यवहार करताना कमीत कमी वेळा घराबाहेर पडावे असे आवाहनही त्यानी केले. 
              खासदार हेमंत पाटील यांनी याप्रसंगी उपस्थिती दर्शवली व अ‍ॅपची सविस्तर माहिती घेउन शुभेच्छा दिल्या. किराणा सुविधा देतांनाच शेतकर्‍यांसाठी ह्या ऍपमध्ये भाजीपाला व फळे घरपोच पुरवण्याची सुविधाही उपलब्ध करून द्यावी अशी सूचनाही खासदार पाटील ह्यांनी यावेळी केली. 
              किनवट कार्ट च्या लोकार्पण प्रसंगी बोलताना सहायक जिल्हाधिकारी अभिनव गोयल म्हणाले की, सध्याच्या कोरोनाच्या विषाणूच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कमीत कमी वेळा घराबाहेर पडावे ह्या विचारातुनच ह्या सॉफ्टवेअरची संकल्पना रूचली. हे सॉफ्टवेअर बनवण्यासाठी पुणे मुंबई सारख्या शहरातील सॉफ्ट्वेअर तयार करणार्‍या कंपनीची निवड करण्यापेक्षा सेटट्राईब ह्या संस्थेची निवड केल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळेल व भविष्यात ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी रोजगार निर्मिती साठी उपयोग होईल. 
          याप्रसंगी नगराध्यक्ष आनंद मच्छेवार म्हणाले की, सदर सॉफ्ट्वेअर जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचवण्याची जवाबदारी जनप्रतिनिधींची आहे त्यामुळे सर्वांनी एकत्र येवून नागरिकांना हे सॉफ्टवेअर वापरण्यासाठी प्रवृत्त करावे. उपस्थित पत्रकारांना सुद्धा सदर सॉफ्टवेअरला प्रसिद्धी देण्याचे आवाहन नगराध्यक्ष मच्छेवार यांनी केले. 
           सेटट्राईबचे संचालक सारंग वाकोडीकर यांनी सदर सॉफ्टवेअरचे प्रेसेंटेशन दिले. सॉफ्टवेअरचा डेमो उपस्थितांना दाखवला. सेटट्राईबच्या सीएसआर च्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे टॅलेंट जगभरात पोहोचवण्यासाठी व दर्जेदार सॉफ्टवेअर किनवटकरांना उपलब्ध करून देण्यासाठी किनवट नगर परिषदेला अत्यल्प किमतीत हे सॉफ्टवेअर उपलब्ध करून देण्यात आल्याचेही ते म्हणाले. 
           सदर लोकार्पण प्रसंगी मुख्याधिकारी निलेश सुंकेवार यांनी प्लेस्टोरवर हे सॉफ्ट्वेअर किनवट कार्ट ह्या नावाने उपलब्ध असून जास्तीत जास्त नागरीकांनी डाउनलोड करून ह्याचा उपयोग घ्यावा असे आवाहन केले.
        या लोकार्पण सोहळ्याला अनिल तिरमनवार, मारोती भरकड, बालाजी पावडे,  भाजपाचे तालुका अध्यक्ष संदीप केंद्रे, नप सभापती व्यंकट नेम्मानिवार, शहराध्यक्ष श्रिनिवास नेम्मानिवार, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष हिराणी, माजी नगराध्यक्ष साजीद खान, मधुकर आन्नेलवार,  नगरसेवक बाबुराव ओद्दीवार, फेरोज तंवर, शिवा आंधळे, नरेश सिरमनवार, मनोज तिरमनवार, यांच्यासह शहरातील प्रतिष्ठित व्यापारी व  पत्रकार बांधव उपस्थित होते.
        
टाळेबंदी संपली म्हणजे कोरोना विषाणू संपला असे मुळीच नाही. या विषाणू सोबत जगण्याची वास्तविकता आता स्विकारावी लागणार आहे. वारंवार साबणाने हात धुणे,मास्कचा वापर करणे, कामाशिवाय घराबाहेर पडू नये. याकरिता ऑनलाईन शिक्षणासारखेच ऑनलाईन व्यवहासाठी, घरपोच वस्तू मिळण्यासाठी ऍपनिर्मितीची संकल्पना सहायक जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी सर्वप्रथम मांडली. जनजागृती कक्ष प्रमुख गट शिक्षणाधिकारी सुभाष पवने यांचे अधिनस्त तीन संगणक शिक्षक दिले. त्यांनाही संकल्पना सांगितली. त्या संगणक शिक्षकांनी प्राथमिक स्वरूपात ऍप तयार केले. याला अधिक चांगल्या पध्दतीनं विकसीत करावयाचे असेल तर येथील सेटट्राईब आयटी सोल्यूशनची मदत घ्यावी लागेल असं त्यांनी सूचविलं.
        त्यानंतर किनवट नगर परिषदेने पुढाकार घेऊन आवश्यक ते योगदान दिलं. त्यानंतर तंत्रज्ञांच्या मोठ्या परिश्रमाने सहायक जिल्हाधिकारी यांच्या संकल्पनेतील होम डिलेव्हरीच्या ह्या ऍपचं आज मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण झालं .

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News