वीज पडून मृत्यू पावलेल्यांच्या वारसाला आमदार भीमराव केराम व तहसिलदार उत्तम कागणे यांचे हस्ते धनादेश प्रदान - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Saturday, June 13, 2020

वीज पडून मृत्यू पावलेल्यांच्या वारसाला आमदार भीमराव केराम व तहसिलदार उत्तम कागणे यांचे हस्ते धनादेश प्रदान



किनवट : वीज पड्न मृत्यू पावलेल्या तीन व्यक्तिंच्या वारसाला शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या मदतीचा प्रत्येकी चार लाख रुपयाचा धनादेश आमदार भीमराव केराम व तहसिलदार उत्तम कागणे यांचे हस्ते प्रदान करण्यात आला.
                अचानक वीज पडल्याने  तालुक्यातील पाटोदा (बुद्रुक) येथील आतिष संजय सोनुले, मांडवा (कि.) येथील सुभाष रामराव पेंदोर व शिवणी येथील किशन राघोजी भिसे  हे आकस्मिक मरण पावले होते. 
                नैसर्गिक आपत्तीत वीज पडून मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या परिवाराला द्यावयाच्या मदतीच्या शासन तरतुदीनुसार प्रत्येकी चार लाख रुपयाचा धनादेश शनिवारी ( ता. १३ )  तहसील कार्यालयात आमदार भीमराव केराम व तहसिलदार उत्तम कागणे यांचे हस्ते देण्यात आला. वनवासी कल्याण आश्रमचे गोवर्धन मुंडे, अनिल तिरमनवार, घोटीचे उपसरपंच बालाजी पावडे, बालाजी आलेवार, निळकंठ कातले, मारोती भरकड आदी कार्यकर्ते उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News