नांदेड : आज शनिवारी ( दिनांक १३ ) सायंकाळी पाच वाजता प्राप्त माहितीनुसार पंजाव भवन यात्री निवास नांदेड येथील ५ रुग्ण व डॉ . शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथील ३ रुग्ण असे ८ रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे . त्यामुळे सुट्टी देण्यात आलेल्या आतापर्यंतच्या रुग्णांची संख्या १६८ एवढी झाली आहे . आज दिनांक १३/०६/२०२० रोजी प्राप्त झालेल्या एकूण ९७ अहवालापैकी ६२ अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले व नवीन २२ रुग्णांचा स्वॅव पॉझीटीव्ह आल्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या २५६ एवढी झाली आहे .
प्राप्त झालेल्या २२ पॉझीटीव्ह रुग्णांपैकी १३ पुरुष ज्यांची वय वर्ष अनुक्रमे २५,२८,२९,३०,३०,३१,३४ , ३५,३५,४९,५१,५५ व ६७ अशी आहेत आणि ९ स्त्री रुग्ण ज्यांची वय वर्ष अनुक्रमे ३१,३६,४३,४५,४७.४८,४८,४ ९ व ५५ अशी आहेत . सर्व रुग्णांची सद्यस्थितीत प्रकृती स्थिर आहे . चिखलवाडी परिसरातील पुरुष वय वर्ष ५५ व १ महिला वय वर्ष ४८ , विजय कॉलोनी १ महिला वय वर्ष ५५ . दीपनगर १ पुरुष ४९ वर्ष एच.आय.जी.कॉलोनी १ महिला वय वर्ष ४८, झेंडा चौक १ महिला वय वर्ष ४५ , स्वामी विवेकानंद नगर १ पुरुष वय वर्ष ३४ , सोमेश कॉलोनी १ पुरुष वय वर्ष ५१ व १ महिला वय वर्ष ४९ ,पद्माजा सिटी १ महिला वय वर्ष ४३ , सिडको १ महिला वय वर्ष ४७ , यशवंत नगर १ पुरुष वय वर्ष ३५ , विणकर कॉलोनी १ पुरुष वय वर्ष ३० , भाग्यनगर रोड १ महिला वय वर्ष ३१ , संत ज्ञानेश्वरनगर १ पुरुष वय वर्ष ३५ , न्यायनगर १ पुरुष वय वर्ष २८ , श्रीकृष्णनगर तरोडा ( बु ) १ पुरुष वय वर्ष ३१ , विश्वदीप नगर १ पुरुष २५ , महावीर चौक १ पुरुष वय वर्ष ६७ , इतवारा १ पुरुष वय वर्ष ३० , चैतन्यनगर १ महिला वय वर्ष ३६ व कामठा ( छ ) ता.अर्धापूर येथील १ पुरुष वय वर्ष २९ असे हे रुग्ण आहेत.
आतापर्यंत २५६ रुग्णांपैकी १६८ रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे व उर्वरित ७५ रुग्णांवर औषधोपचार चालू असून त्यातील ३ रुग्ण ; त्यापैकी ०१ स्त्री रुग्ण ज्यांचे वय ५२ आणि ०२ पुरुष ज्यांचे वय ५२ व ५४ वर्ष असून त्यांची प्रकृती गंभीर स्वरूपाची आहे .
दि . १३/०६/२०२० रोजी कोरोना संशयित व कोविड रुग्णांचा संक्षिप्त माहिती तक्ता : सर्वेक्षण १४४८८०, घेतलेले वेब ४९४९, निगेटिव्ह स्वॅब ४२५३,आज रोजी पॉझीटीव्ह स्वॅब संख्या २२, एकूण पॉझीटीव्ह रुग्ण २५६, स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या १८७, स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या ८३, मृत्यू संख्या १३, रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली संख्या १६८, रुग्णालयात उपचार घेत असलेले रुग्ण ७५, स्वॅब तपासणी रुग्ण संख्या १६३.
शनिवारी ( दिनांक १३जून रोजी ) १६३ स्वॅब तपासणी साठी पाठविण्यात आलेले आहेत त्यांचे अहवाल उद्या सायंकाळ पर्यंत प्राप्त होतील . एकूण २५६ रुग्णांपैकी १३ रुग्णाचा मृत्यू झालेला आहे व १६८ रुग्ण हे बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे . उर्वरित रुग्णांपैकी डॉ . शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे १५ रुग्ण , पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे एकूण ५२ तसेच ग्रामीण रुग्णालय माहूर कोविड केअर सेंटर येथे १ रुग्ण , उपजिल्हा रुग्णालय मुखेड येथे २ उपचारासाठी दाखल असून ५ रुग्ण औरंगाबाद येथे संदर्भित झाले आहेत . तरी जनतेने अफवांवर विश्वासु ठेवु नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भीती बाळगु नये आणि अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये आणि प्रशासनास सहकार्य करावे . तसेच सर्व जनेतेने आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ऍप डाऊनलोड करून घ्यावे जेणेकरून आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास सदरील ऍप सतर्क करण्यास मदत करते. असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.
कोरोना विषाणू संसर्गाबाबत नांदेड जिल्ह्यातील माहिती
दि: 13/06/2020 वेळ 05.00 PM
• आत्तापर्यंत एकूण संशयित - 4900
• एकूण क्वारंटाईन व्यक्तींची संख्या- 4515
• क्वारंटाईन कालावधी पूर्ण - 2615
• अजून निरीक्षणाखाली असलेले - 204
• पैकी दवाखान्यात क्वारंटाईनमध्ये - 110
• घरीच क्वारंटाईनमध्ये असलेले - 4405
• आज घेतलेले नमुने - 140
• एकुण नमुने तपासणी- 4949
• एकुण पॉझिटीव्ह रुग्ण- 256
• पैकी निगेटीव्ह - 4253
• नमुने तपासणी अहवाल बाकी- 163
• नाकारण्यात आलेले नमुने - 83
• अनिर्णित अहवाल – 187
• कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतलेले - 168
• कोरोना बाधित रुग्णांची मृत्यू संख्या – 13
• जिल्ह्यात बाहेरून आलेले एकूण प्रवासी 144880 राहण्याचा सल्ला दिलेला आहे. तसेच त्यांच्या हातावर शिक्केही मारण्यात आले आहेत.




No comments:
Post a Comment