किनवट : राज्यातील वाढत जाणाऱ्या मागासवर्गीय, बौध्द व भटक्यांवरील अत्याचारांचा सरकारला जाब विचारण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशावरुन दिनांक 17 जुन 2020 रोजी किनवट उपविभागीय कार्यालय येथे वंचित बहुजन आघाडी किनवट तर्फे निवेदन देण्यात आले.
निवेदन देताना मोहन राठोड (प्रदेश महासचिव वं.ब.आ.), सुरेश जाधव (जिल्हाउपाध्यक्ष, वं.ब.आ.), राजुदादा शेळके (किनवट ता.अध्यक्ष, वं.ब.आ.), मिलिंद वाठोरे, अक्रम खान, दयानंद काळे, प्रीती मुनेश्वर, जयश्री भरणे, रजिया शेख, संघपाल कोठेकर, प्रशिक मुनेश्वर यांची उपस्थिती होती. यावेळी पत्रकारांशी बोलतांना वंचित बहुजन आघाडीचे किनवट तालुका अध्यक्ष राजेंद्र शेळके यांनी सांगितले की, निवेदनामध्ये अरविंद बनसोड व विराज जगताप यांच्यावर झालेल्या अत्याचार प्रकरणाबरोबरच वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या इतर 10 प्रकरणाचाही समावेश करण्यात आलेला आहे. तसेच निवेदनामधील प्रमुख मागण्या अशा की, अनुसुचीत जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 15 नुसार अरविंद बनसोड व विराज जगताप या प्रकरणासह इतर सर्व प्रकरणातील तक्रारदारांच्या मागणीनुसार विशेष सरकारी वकील त्या त्या ठिकाणी नियुक्त करावेत, तसेच पुणे, अहमदनगर, बीड, नागपूर व महाराष्ट्रातील इतर अत्याचारप्रवण भागासह प्रत्येक जिल्ह्यात विशेष न्यायलये स्थापन करणे व प्रत्येक जिल्ह्यात सामाजिकद्रुष्ट्या जागरुक पोलीस निरीक्षकांकडुन या जातीय अत्याचाराची चौकशी करण्यात यावी, पीसीआर व अनुसुचीत जाती-जमाती अत्याचार प्रतीबंध कायद्याच्या अमंलबजावणीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय दक्षता व देखरेख समितीची तातडीने बैठक घ्यावी व वस्तुस्थिती अहवाल प्रकाशीत करावा.




No comments:
Post a Comment