राज्यातील आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम सेवेत सामावून घ्या -आमदार भीमराव केराम - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Thursday, June 18, 2020

राज्यातील आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम सेवेत सामावून घ्या -आमदार भीमराव केराम



किनवट : राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अधिकारी कर्मचारी महासंघाच्या वतीने कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम सेवेत सामावून घ्या या निवेदनाची आमदार भीमराव केराम यांनी तात्काळ दखल घेत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे  दि. 17 निवेदन पाठवले आहे.  
               या निवेदनात शासन निर्णयानुसार राज्यात सुरू असलेल्या कोरोना महामारी नियंत्रन आणण्यासाठी मोलाचे काम करणारे तसेच राज्यामध्ये मागील पंधरा वर्षांपासून आरोग्य विभागात  अधिकारी व कर्मचारी हे कंत्राटी तत्वावर तुटपुंज्या मानधनावर कर्मचारी अविरत सेवा देत आहेत. कोरोना वैश्विक महामारीच्या भयावह परिस्थिती जिवाची पर्वा न करता  हे कर्मचारी नेटाने काम करत आहेत. आपल्या कुटुंबाचा विचार न करता आपले कर्तव्य बजावणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना  कायम सेवेत सामावून न घेता नव्याने  भरती प्रक्रिया करण्याचा प्रयत्न चालू आहे. त्यांच्या आरोग्य विभागातील समायोजना बाबत कोणताही निर्णय शासनाने कंत्राटी कर्मचाऱ्यांना बाबत घेतला नाही. नव्याने होणाऱ्या प्रक्रियेमध्ये त्यांच्या शैक्षणिक पात्रतेचा व अनुभवाचा विचार करुन समायोजन करावे अशा प्रकारचे निवेदन आ.भिमराव केराम यांनी दिले आहे. 
               कंत्राटी कर्मचारी यांनी आ. भिमराव केराम यांना आपल्या मागणी संदर्भात दि. 17 रोजी निवेदन दिले. या वेळी अर्बन एएनएम रत्नमाला एम.नागभिडे, एस.के.तायडे, एस.बी.चव्हाण व   पि.एच.सी.  ए.एन.एम. वदना मेश्राम, डिंपल पवार,एस.एस. शेंडे,एस.जी. मांढरे,एस.डी. वानखेडे, तालुका समूह संघटक जनार्धन काकडे, लेखापाल प्रदीप देशमुख, डाटा एन्ट्री ऑपरेटर प्रदीप शिन्दे उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News