नांदेड जिल्ह्यात १० व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह : बाधितांमध्ये ५ पुरुष व ५ महिलांचा समावेश - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Thursday, June 18, 2020

नांदेड जिल्ह्यात १० व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह : बाधितांमध्ये ५ पुरुष व ५ महिलांचा समावेश


नांदेड : आज गुरुवारी ( दिनांक १८/०६/२०२० रोजी ) सायंकाळी ०५.०० वाजता कोरोना विषाणू संदर्भात प्राप्त माहितीनुसार प्राप्त झालेल्या एकूण २२६ अहवालापैकी १९८ निगेटिव्ह अहवाल प्राप्त झाले , तर १० रुग्ण पॉझीटीव्ह आढळल्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या २९६ एवढी आहे .
            आज दिनांक १८/०६/२०२० रोजी उपजिल्हा रुग्णालय मुखेड कोविड केअर सेंटर येथील १ रुग्ण बरा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे . त्यामुळे सुट्टी देण्यात आलेल्या आतापर्यंतच्या रुग्णांची संख्या १८१ एवढी झाली आहे . आज दिनांक १८/०६/२०२० रोजी प्राप्त झालेल्या एकूण २२६ अहवालापैकी १९८ निगेटिव्ह अहवाल प्राप्त झाले, तसेच १० रुग्ण पॉझीटीव्ह आढळल्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या २९६ एवढी आहे . यात ५ पुरुष असून सोमेश कॉलनी येथील वय वर्ष ७५ परिमलनगर येथील वयवर्ष ४७. चैतन्य नगर येथील वय वर्ष ४३ , भगतसिंघ रोड येथीत २४ व औरंगाबाद येथीत १ पुरुष वय वर्ष ३३ यांचा समावेश आहे . तसेच ५ महिला रुग्ण आहेत. त्यामध्ये कामठा बु . येथील २ महिला वय वर्ष १९ व २२. गजानन कॉलोनी तरोडा बु . येथील रुग्ण वय वर्ष ४२. विठ्ठल मंदिर मुखेड येथील १ रुण वय वर्ष ५५ तसेच कळमनुरी जि . हिंगोली येथील १ रुग्ण वय वर्ष ५५ यांचा समावेश आहे . आतापर्यंत २९६ रुग्णांपैकी १८१ रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे व उर्वरित १०२ रुग्णांवर औषधपचार चालू असून त्यातील ३ रुग्ण त्यापैकी ०१ स्त्री रुग्ण ज्यांचे वय ५२ आणि ०२ पुरुष ज्यांचे वय ५२ व ५४ वर्ष असून त्यांची प्रकृती गंभीर स्वरूपाची आहे .

दि . १७/०६/२०२० रोजी कोरोना संशयित व कोविड रुग्णांचा संक्षिप्त माहिती तक्ता :  सर्वेक्षण १४५६८३, घेतलेले स्वव ५५१४, निगेटिव्ह स्वेब ४८४१, आज रोजी पॉझीटीव्ह स्वॅव संख्या १०, एकूण पॉझीटीव्ह रुग्ण २९६,स्वॅव तपासणी अनिर्णीत संख्या २३२, स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या ९१, मृत्यू संख्या १३, रुग्णालयातून सुटी देण्यात आलेली संख्या १८१, रुग्णालयात उपचार घेत असलेले रुग्ण १०२, स्वॅब तपासणी रुग्ण संख्या ४५.

दिनांक १८/०६/२०२० रोजी ४५ स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आलेले आहेत. त्यांचे अहवाल उद्या सायंकाळपर्यंत प्राप्त होतील . एकूण २९६ रुग्णांपैकी १३ रुग्णांचा मृत्यू झालेला आहे व १८१ रुग्ण हे बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे . उर्वरित १०२ रुग्णांपैकी डॉ . शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे १८ रुग्ण , पंजाव भवन कोविड केअर सेंटर येथे एकूण ६६ तसेच उपजिल्हा रुग्णालय मुखेड येथे १३ उपचारासाठी दाखल असून ५ रुग्ण औरंगाबाद येथे संदर्भित झाले आहेत . तरी जनतेने अफवांवर विश्वासु ठेवु नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भीती बाळगु नये आणि अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये आणि प्रशासनास सहकार्य करावे . तसेच सर्व जनतेने आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ऍप डाऊनलोड करून घ्यावे जेणेकरून आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास सदरील ऍप सतर्क करण्यास मदत करते.असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी स्पष्ट करुन प्रशासनास जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे .                            

कोरोना विषाणू संसर्गाबाबत नांदेड जिल्ह्यातील माहिती
दि: 18/06/2020 वेळ 05.00 PM

• आत्तापर्यंत एकूण संशयित - 5441
• एकूण क्वारंटाईन व्यक्तींची संख्या- 4948
• क्वारंटाईन कालावधी पूर्ण - 2825
• अजून निरीक्षणाखाली असलेले - 299
• पैकी दवाखान्यात क्वारंटाईनमध्ये - 130
• घरीच क्वारंटाईनमध्ये असलेले - 4818
•   आज घेतलेले नमुने - 35
• एकुण नमुने तपासणी- 5514
• एकुण पॉझिटीव्ह रुग्ण- 296
• पैकी निगेटीव्ह - 4841
• नमुने तपासणी अहवाल बाकी- 45
• नाकारण्यात आलेले नमुने - 91
• अनिर्णित अहवाल – 232
•       कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतलेले - 181
• कोरोना बाधित रुग्णांची मृत्यू संख्या – 13
• जिल्ह्यात  बाहेरून आलेले एकूण प्रवासी 145683 राहण्याचा सल्ला दिलेला आहे. तसेच त्यांच्या हातावर शिक्केही मारण्यात आले आहेत.


No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News