अतिवृष्टीग्रस्तांना तात्काळ सरसकट शासकीय मदत जाहीर करावी : राकाँपा(शप)ची मागणी - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Tuesday, September 3, 2024

अतिवृष्टीग्रस्तांना तात्काळ सरसकट शासकीय मदत जाहीर करावी : राकाँपा(शप)ची मागणी

 



किनवट : सतत कोसळत असलेल्या मुसळधार पाऊसामुळे शेतक-यांचे अतोनात नुकसान झाले असुन दिनांक ३१ ऑगस्ट रोजी रात्री झालेल्या ढगफुटीसदृष्य पाऊसामूळे किनवट तालुक्यातील अनेक घरात व शेतामध्ये पाणी शिरल्याने नागरीकांचे अतोनात नुकसान झाले आहे या अनुषंगाने माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे  तत्काळ सरसकट शासकीय मदत जाहीर करण्याची मागणीचे निवेदन सहाय्यक जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. 

     राष्ट्रवादी कॉग्रेस श.प.पक्षाचे तालुका अध्यक्ष प्रकाश गब्बा राठोड यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनात केलेल्या मागण्या पुढील प्रमाणे :  शेतक-यांना कोणत्याही तांत्रिक अडचणीत न आणता सरसकट शासनाची मदत जाहीर करण्यात यावी,  झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करुन शेती व घरामध्ये अतिवृष्टीचे पाणी शिरुन झालेल्या नुकसानीचा मोबदला नागरीकांना देण्यात यावा, शेतक-यांना जिओ टॅग फोटो, ऑनलाईन पाहणी अहवाल जोडणे, ऑनलाईन छायाचित्र पाठवणे या सारख्या किचक़ट तांत्रिक अडचणी निर्माण न करता सरसकट शेतकरी व नागरीकांना शासनाने मदत जाहीर करावी. 

           या मागण्या मान्य न झाल्यास शासनाच्या विरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा ही निवेदनात देण्यात आलेला आहे. या निवेदनावर तालुका अध्यक्ष प्रकाश राठोड यांच्यासह जिल्हा उपाध्यक्ष अनिल पाटील, कार्याध्यक्ष जहीरोद्दीन खान, बाजार समितीचे सभापती गजानन मुंडे पाटील, युवक तालुका अध्यक्ष बालाजी बामणे, उपसभापती राहुल नाईक, माजी सरपंच शेख सलिम शे.मदार, माजी सरपंच प्रवीण मॅकलवार, उपसरपंच शेख सरु यांच्यासह अली अहेमद अन्सारी, रवि तिरमनवार, शेख अफरोझ यांच्या स्वाक्ष-या आहेत.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News