![]() |
| भारत सरकारचे संस्कृति मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांचे हस्ते पुरस्कार स्विकारतांना कविता जोशी |
नांदेड : भारत सरकारच्या ''डिजिटल डिस्ट्रिक्ट रिपॉझिटरी' प्रकल्पांतर्गत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल जिल्ह्याच्या डीडीआर प्रोजेक्टच्या ब्रँड अँबेसिडर कविता जोशी यांचा नवी दिल्ली येथे भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयात तर्फे नुकताच गौरव करण्यात आला.
गुरुवारी ( ता.२५ जून २०२६) सीसीआरटीच्या भव्य प्रांगणात हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. *संस्कृति मंत्रालयाच्या अखत्यारित असलेल्या सांस्कृतिक स्रोत एवं प्रशिक्षण केंद्र (सीसीआरटी), नवी दिल्ली येथे डिजिटल डिस्ट्रिक्ट रिपॉजिटरी (DDR) सम्मान समारोहाचे आयोजन करण्यात आले होते. या समारंभात अज्ञात स्वतंत्र्य र्सैनिकांच्या इतिहासाचे संकलन करून भावी पीढीपर्यंत पोचवण्याच्या कामात महत्वपूर्ण भूमिका निभावणाऱ्या योगदानकर्ते सीसीआरटी जिल्हा समन्वयक शिक्षकांना सम्मानित केले गेले.
भारत सरकारचे संस्कृति मंत्री गजेंद्र सिंह शेखावत, सीसीआरटीचे अध्यक्ष डॉ. विनोद नारायण इंदुरकर, भारत सरकारच्या संस्कृति मंत्रालयाचे संयुक्त सचिव समर नंदा, कमलेश कुमार मिश्र, निदेशक राजीव कुमार यांच्या उपस्थितीत कविता जोशी यांना राष्ट्रीय सन्मान पुरस्कार, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देण्यात आले.
या कार्यक्रमासाठी सीसीआरटीचे सीसीआरटीचे संचालक पप्पूंजय कुमार व उपसंचालक डॉ. राहुल कुमार हे उपस्थित होते. स्वातंत्र्यलढ्यातील तसेच स्वातंत्र्या नंतर लढल्या गेलेल्या हैद्राबाद मुक्ती संग्रामातील अज्ञात नायक, घटना आणि ऐतिहासिक स्थळांचा इतिहास शब्दबद्ध करण्यासाठी केंद्र सरकारने हा प्रकल्प सुरू केला होता. यात कविता जोशी यांनी नांदेड, हिंगोली, परभणी तसेच बीड,लातूर, संभाजीनगर जिल्ह्यातील १५० पेक्षा जास्त स्वातंत्र्य सैनिकांच्या कथा मंत्रालयाच्या पोर्टलवर पाठवल्या होत्या. त्यापैकी १३० हून अधिक कथा पोर्टलवर प्रकाशित होऊन देशातील विविध भाषांमध्ये अनुवादित झाल्या आहेत. कविता जोशी यांनी केवळ जुनी कागदपत्रे तपासण्याबरोबरच थेट स्वातंत्र्यसैनिकांच्या घरी जाऊन त्यांच्या नातेवाईकांकडून अधिकृत व प्रत्यक्ष माहिती मिळवली व हा ऐतिहासिक दस्तऐवज तयार केला. यासोबतच जिल्ह्यातील हैद्राबाद मुक्तीसंग्रामातील ऐतिहासिक घटना त्यांनी संकलित केल्या आहेत. या ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण कामगिरीचे कौतुक म्हणून केंद्र सरकारच्या वतीने कविता जोशी यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. त्यांच्या यशामुळे नांदेड जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.





No comments:
Post a Comment