प्रशांत कोरटकर यास कोल्हापूर पोलिसांनी घेतले तेलंगणातील मंचरियाल येथून ताब्यात - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Monday, March 24, 2025

प्रशांत कोरटकर यास कोल्हापूर पोलिसांनी घेतले तेलंगणातील मंचरियाल येथून ताब्यात





कोल्हापूर : इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना फोनवरुन धमकी देवून महापुरुषांबाबत बदनामीकारक वक्तव्य केलेच्या अनुषंगाने जुना राजवाडा पोलीस ठाणे येथे गु.र.नं. १४०/२०२५ बीएनएस अन्वये आरोपी नामे प्रशांत कोरटकर याचेविरुध्द गुन्हा नोंद करणेत आला होता.

     गुन्हयातील पाहिजे आरोपी प्रशांत कोरटकर यास स्थानिक गुन्हे शाखा व जुना राजवाडा पोलीस ठाणे कोल्हापूर यांचे संयुक्त पथकाने दिनांक २४/०३/२०२५ रोजी दुपारी ०२.४५ वाजता मंचरियाल, राज्य तेलंगणा या ठिकाणी ताब्यात घेतले असून सदर आरोपीस घेवून पोलीस पथके कोल्हापूरकडे रवाना झालेली आहेत.

    आरोपी प्रशांत कोरटकर यास कोल्हापूर येथे आणताच पुढील कायदेशीर प्रक्रिया पार पाडून त्यास दिनांक २५/०३/२०२५ रोजी मा. न्यायालयात हजर करणेत येणार आहे.

     सदरची कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक  रविंद्र कळमकर, जुना राजवाडा पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक  संजीव झाडे, पोलीस उप निरीक्षक शेष मोरे, पोलीस अंमलदार सुरेश पाटील, रामचंद्र कोळी, रुपेश माने, सुशील पाटील तसेच पोलीस उप निरीक्षक संतोष गळवे, पोलीस अंमलदार वैभव खोत, निलेश नाझरे, अतुल देसाई, रोहत टिपुगडे यांचे पथकाने केलेली आहे. असे पोलीस अधीक्षक कार्यालय, कोल्हापूरचे जनसंपर्क अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.



No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News