सेवानिवृत्तीनंतरचे जीवन सक्षम व्हावे; आर्थिक व सायबर साक्षरतेवर भर #जिल्हा परिषदेच्या सेवानिवृत्तीपूर्व प्रशिक्षण शिबिराच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Monday, May 25, 2026

सेवानिवृत्तीनंतरचे जीवन सक्षम व्हावे; आर्थिक व सायबर साक्षरतेवर भर #जिल्हा परिषदेच्या सेवानिवृत्तीपूर्व प्रशिक्षण शिबिराच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात




नांदेड,25: नांदेड जिल्हा परिषदेच्या वतीने विविध विभागातील पुढील सहा महिन्यांत सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या सेवानिवृत्तीपूर्व प्रशिक्षण शिबिराच्या दुसऱ्या टप्प्याला आज प्रारंभ झाला. जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

      यावेळी एसबीआयचे व्यवस्थापक चव्हाण व सतीश राऊत यांनी सेवानिवृत्तीनंतरच्या आर्थिक नियोजनाविषयी मार्गदर्शन केले. सेवानिवृत्तीच्या वेळी मिळणाऱ्या निधीचे योग्य नियोजन करणे आवश्यक असून अधिकृत व विश्वासार्ह बँकांमध्ये गुंतवणूक करावी, असा सल्ला त्यांनी दिला. उतारवयात आर्थिक सुरक्षितता महत्त्वाची असल्याचे सांगताना प्रत्येक आर्थिक व्यवहारात नॉमिनीची नोंद असणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

      सायबर क्राईम विभागाचे पोलीस निरीक्षक वसंत सर्पे यांनी सायबर साक्षरता ही काळाची गरज या विषयावर मार्गदर्शन केले. मोबाईलवर येणाऱ्या फ्रॉड लिंक, एपीके फाईल, फेसबुक व सोशल मीडियावरील भुलवणारे संदेश यांची ओळख पटविणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. सायबर फसवणुकीसंदर्भात तक्रार करण्यासाठी 1930 या हेल्पलाईन क्रमांकाचा वापर करावा, असे आवाहनही त्यांनी केले. तसेच विविध ऑनलाइन संकेतस्थळे व सुरक्षिततेच्या उपायांविषयी उपस्थितांना माहिती देण्यात आली.

     या कार्यक्रमात आहारतज्ज्ञ डॉ. मनीषा जाधव यांनी उत्तम आरोग्यासाठी गुरुकिल्ली या विषयावर व्याख्यान दिले. योग्य आहार, नियमित योगाभ्यास, आरोग्यपूर्ण जीवनशैली आणि मानसिक स्वास्थ्य याविषयी त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपलेखा व वृत्ताधिकारी विशाल हिरवे यांनी केले, तर सूत्रसंचालन मिलिंद व्यवहारे यांनी केले. यावेळी मुख्य लेखा व वित्त अधिकारी महेश देशमुख, सहाय्यक गट विकास अधिकारी हातमोडे, उपशिक्षणाधिकारी राठोड आदींची उपस्थिती होती. या प्रशिक्षण शिबिराचा समारोप आज करण्‍यात येणार आहे.



जिल्हा परिषदेतंर्गत विविध विभागांतील पुढील सहा महिन्यांत सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. सेवानिवृत्तीनंतरचे जीवन सक्षम, सुरक्षित व आनंदी राहावे हा या प्रशिक्षणामागील मुख्य उद्देश आहे. आरोग्य, आर्थिक सुरक्षितता आणि सकारात्मक जीवनशैली याविषयी या कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात येत आहे. हा कर्मचाऱ्यांच्या भविष्याची काळजी घेणारा उपक्रम आहे.

- मेघना कावली, मुख्‍य कार्यकारी अधिकारी, जि.प. नांदेड

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News