गरजू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक भीमजयंती : विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गो-हे यांच्या कडून एक वही एक पेन अभियानचे कौतुक - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Tuesday, March 25, 2025

गरजू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक भीमजयंती : विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गो-हे यांच्या कडून एक वही एक पेन अभियानचे कौतुक

 


 मुंबई( विशेष प्रतिनिधी उदय नरे ) : समाजातील आर्थिक दुर्बल व आदिवासी  भागातील गरजू विद्यार्थ्यांसाठी काम करणा-या महामानव प्रतिष्ठान व एक वही एक पेन अभियानने यंदाची भीमजयंती शैक्षणिक भीम जयंती साजरी करण्याचे आवाहन केले आहे.

       या अभियानांतर्गत विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गो-हे यांच्या विधानभवन कक्षात आज भेट घेण्यात आली. समाजातील गरजू विद्यार्थ्यांसाठी मागील १० वर्षांपासून सुरू असलेल्या एक वही एक पेन अभियानाचे यावेळी डाॅ. गो-हे यांनी कौतुक केले. महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे शिक्षणाप्रती असलेली भूमिका लक्षात घेता चळवळीत काम करणा-या समाजसेवकांनी राज्यात ठिकठिकाणी  हे अभियान राबवावेअसे आवाहन देखील त्यांनी केले.

     यावेळी शिवसेना उपनेत्या कला शिंदे, उपनेते राहुल लोंढे, अभियानचे प्रमुख ज्येष्ठ पत्रकार समाजभूषण राजू झनके, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे कार्यकारिणी सदस्य ज्येष्ठ पत्रकार  खंडूराज गायकवाड, ज्येष्ठपत्रकार समाजभूषण नासिकेत पानसरे, ज्येष्ठ पत्रकार जासंग बोपेगावकर, महेश पावसकर व पत्रकार प्रफुल चव्हाण हे उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News