यळकोट यळकोट जय मल्‍हार घोषाने माळेगाव यात्रेला सुरुवात - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Thursday, December 22, 2022

यळकोट यळकोट जय मल्‍हार घोषाने माळेगाव यात्रेला सुरुवात



श्रीक्षेत्र माळेगाव, मिडीया सेंटर, : उत्‍तम जागा पाहूनी मल्‍हारी देव नांदे गड जेजुरी अशा जयघोषात येळकोट येळकोट जय मल्‍हार म्‍हणत, बेलभंडा-याची उधळण करीत पारंपारीक पध्‍दतीने यंदाही माळेगावच्‍या श्रीखंडोबा रायाच्‍या यात्रेस शुभारंभ झाला आहे. यावेळी लाखो भाविकांनी पालखीचे दर्शन घेतले. खंडोबाच्‍या व मानक-यांच्‍या पालखीचे प्रतिवर्षाप्रमाणे शासकीय विश्रामगृहावर जिल्‍हा परिषदेच्‍या वतीने स्‍वागत करण्‍यात आले.



    प्रारंभी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते सपत्नीक शासकीय पुजा करण्‍यात आली. यावेळी आमदार श्यामसुंदर शिंदे पाटील, आशाताई श्यामसुंदर शिंदे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले, जिल्हा परिषद खाते प्रमुखांची उपस्थिती होती. त्‍यानंतर दुपारी पालखी पुजनानंतर देव स्‍वारी काढण्‍यात आली यावेळी


मानक-यांचा गौरव 


पालखीचे मानकरी गणपतराव मल्‍हारी नाईक (रिसनगाव), खुशाल भगवान भोसीकर (पानभोसी), व्‍यंकटराव मारोती पांडागळे (शिराढोण), गोविंदराव बाबाराव नाईकवाडे मुकदम पानभोसी, नागेश गोविंदराव महाराज कुरुळा, पांडुरंग नारायण पाटील, माळेगाव, विजयकुमार शंकरराव कनकदंडे आष्टूर या मानक-यांचा जिल्हा परिषदेच्या वतीने फेटा बांधून गौरव करण्‍यात आला.


खंडोबा यात्रेत वाघ्‍या-मुरळी 


उत्‍तम जागा पाहूनी मल्‍हारी देव नांदे गड जेजूरी उत्‍तराची जेजूरी गडाला नऊ लाख पायरी असा घोष करत वाघ्‍या मुरळी खंडोबाची सेवा करते.

     पारंपारीक पध्‍दतीने कवडयाच्‍या माळा, माळी लांब हळदीचा मळभट, हातापायावर चाबकाचे फटके मारत वाघ्‍या मुरळी खंडोबाची सेवा करत असते. या वाघ्‍या मुरळीला पाहण्‍यासाठी हजारो भाविकांनी मोठी गर्दी केली आहे.

    यावेळी मुख्य लेखा व वित्त अधिकारी शिवप्रसाद चन्ना, शिक्षणाधिकारी प्रशांत दिग् सकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा जाधव-कापसे, व्ही. आर। पाटील, नारायण मिसाळ, रेखा काळम-कदम, उप विभागीय अधिकारी शरद मंडलिक, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, समाजकल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार, गट विकास अधिकारी एस. एच. वाव्हळे, माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रसेन पाटील, संजय कऱ्हाळे, विजय धोंडगे आदींची उपस्थिती होती.



No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News