नांदेड : जिल्हयातील १७ मंडळात अतिवृष्टी झाली आहे, सर्वाधीक पासुन ११५.०० मि.मि. नोंदवला आहे. यामध्ये बिलोली तालुक्यातील ४ मंडळ, मुखेड तालुकयातील ६ मंडळे, कंधार तालुक्यातील २ मंडळे, नायगांव खै. तालुक्यातील ५ मंडळात अतिवृष्टी झाल्याची नोंद आहे. जिल्ह्यात गोदावरी, मानार, मांजरा, लेंडी या नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाल्यामुळे ह्या नद्या दुथडी भरून वाहत आहेत. मागील २४ तासांपासून तेलंगाना राज्यात मुसळधार पाऊस सुरु असून पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी निजामसागर धरणातून होत असलेल्या विसर्गामुळे शेळगाव, जुने मेदनकल्लूर, सांगवी उमर, तमलूर या गावात पाणी आल्याने प्रशासनाने या चार गावांमधील सुमारे दीड हजार लोकांना सुरक्षित स्थळी SDRF च्या मदतीने हलविण्यात आले आहे. नायगावात स्कूलबसमध्ये अडकलेल्या १८ विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढले असून किनवट जवळील बेल्लोरी कडे जाणाऱ्या नाल्यात ऍटो वाहून गेल्याने एक जण बेपत्ता आहे. त्याचा शोध घेणी सुरू आहे.
सद्यस्थितीत परिस्थिती नियंत्रणात आहे. परंतु नांदेड जिल्हयातील व नांदेड जिल्ह्याला प्रभावीत करणारे धरण, लघु, मध्यम प्रकल्प, बॅरीकेज भरल्याने विसर्ग सुरू होणार आहे. अजून येवा चालू असल्याने परिस्थितीनुसार विसर्ग वाढविण्यात येईन. नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. इसापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस सुरू असल्यामुळे येणा-या येव्यानुसार गुरुवार दि.२८ रोजी रात्री ८ वाजता चालू असलेल्या विसर्गात वाढ करून एकूण विसर्ग वाढविण्यात येणार आहे. तसेच येणा-या येवानुसार विसर्गामध्ये टप्याटप्याने वाढ / घट करण्यात येईल. तरी पेनगंगा नदीच्या दोन्ही तिरावरील नागरिकांनी सुरक्षित स्थळी रहावे.नांदेड जिल्ह्यामध्ये काल पासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामूळे आज ता. २९.०८.२०२५ शुक्रवार रोजी सर्व शाळांना जिल्हाधिकारी महोदयांनी सुट्टी जाहीर केली आहे.अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण नांदेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरण अंबेकर यांनी दिली.
नायगांव खै.- नायगाव तालुक्यातील नरसी गावात अनेकांच्या घरात पाणी घुसले आहे तसेच देगलूर उदगीर रोड बंद झाला आहे. बिलोली- नरसी रोड बंद झाला आहे. मौ. गोदमगाव, परडवाडी, कोलंबी, कहाळापूर ता. नायगाव येथील घरात पाणी घुसले आहे. नर्सी शहरात पाणी शिरले आहे, वाका नांदे हैद्राबाद पुलावरुन पाणी वाहत आहे, कोलंबी, टाकळगांवात काही घरामध्ये पाणी शिरलेले आहे. नायगांव शहरात दत्त नगर व इतर भागात पुराचे पाणी शिरलेले असुन त्याठिकाणी अडकलेल्या नागरीकांना स्थानीक शोध व बचाव पथक तसेच मनपा नांदेड शोध व बचाव पथक मार्फत दत्त मंदिर भागात पाण्यात अडकलेल्या ८ लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. शोध व बचाव कार्य चालु आहे याकामी CRPF मुदखेड चीही मदत घेतली जात आहे. स्कूल बस मध्ये अडकलेल्या १८ विद्यार्थ्यांना गावकऱ्यांच्या मदतीने तलाठी, मंडळ अधिकारी व कोतवाल इ. च्या स्थानीक शोध व बचाव कार्य पथकाच्या माध्यमातुन सुखरूप बाहेर काढण्यात आले
कंधारः-पुराचे पाणी गावात शिरलेली गावे- चौकी महाकाया, गोणार, राऊतखेडा, मंगलसांगवी, बारुळ, भुकमारी, शिर्षी बु, चौकी महाकाया, लाडका काटकळंबा, हाळदा, धानोरा कौठा लाडका गुंडा, बिंधा, दिंडा, तेलूर, येलूर, सावळेश्वर, दहीकळंबा, शेल्लाळी,चौ. धर्मापुरी, देवईचीवाडी, जाकापुर, चिखली संर्पक सुटलेली गावे- गोनार ते जाकापुर पुलावरून पाणी जात असल्यानं जाकापूर संपर्क तुटला आहे रुई, कंधारेवाडी संर्पक तुटला आहे. कंधारेवाडी, मौजे उमरा गावा बाहेरील भीवरा नदीचे पाणी आल्यामुळे सुरक्षिततेसाठी ४ ते ५ कुटुंबांना किसान विद्यालय, उमरा येथे तात्पुरत्या स्वरूपात निवाऱ्यासाठी पाठवण्यात आले आहे. मौजे शिरशी बु येथे सततच्या पावसामुळे शेजारील गावाशी वाहतूक मार्गाचा संपर्क तुटला आहे. जाकापुर गावला दोन्ही बाजूने पाणी झालेले आहे, नंदनवन चंद्र भिकाजी कुलकुलवाड यांच्या घरामध्ये पाणी जाऊन मालाची फार नुकसान झालेली आहे. उमरा गावाचा संर्पक तुटला आहे. मानसिंगवाडी ते गऊळ पुलावरुन पाणी जात असल्याने गावाचा संर्पक तुटला आहे, तेलूर ते कोठा आणि तेलूर ते तेलूर फाटा बारुळ या दोन्ही रस्त्यांच्या पुलावरुन पाणी जात आहे. रुई गगनबिंड पुलावरुन पाणी वाहत आहे गावाचा संर्पक तुटला, मंगलसांगवी गावालगतच्या नाल्याला पुर असुन घरामध्ये नालीचे पाणी शिरले आहे. गोणार येथे भोई समाजाच्या घरामध्ये पाणी शिरले आहे. आलेगांव गावातील ग्रामपंचायत परीसरात पाणी शिरले आहे. बारुळ महादेव मंदीर परीसरात मोठया प्रमाणात पाणी शिरले आहे. पेठवडज गावालगतच्या नाल्याला पुर आला असुन गावात सखल भागात पाणी शिरले आहे. मोहीजा परांडा नाल्याला आलेल्या पुरामुळे गावाचा संर्पक तुटला आहे. नारनाळी गावात पाणी शिरले तसेच शेता मध्ये पाणी शिरले असल्यामुळे व जवळच्या मोतीनाला व मन्याड नदीला पुर आलेला आहे त्यामुळे काही शेतकरी अडकलेले आहे. मादाळी गावात पुर आलेला आहे. कापसी (खु.) ता लोहा गावात पाणी आले आहे. मौजे मरशिवनी येथील बालाजी ज्ञानोबा लुंगारे यांच्या घराची भिंत सततच्या पावसामुळे पडली असून कोणतीही जीवित हानी झाली नाही.
देगलूर- देगलूर तालुक्यात अतिवृष्टीची शक्यता व निजामसागर प्रकल्पाचे पाणी सुटण्याची शक्यता व नदी नाल्यांची पाणी पातळी वाढत असल्याने खबरदारीची योजना म्हणून खालील प्रमाणे नागरीकांना SDRF च्या मदतीने स्थलांतरीत केलेले आहे.
दि.२६,२७, व २८ ऑगस्ट रोजी देगलूर तालुक्यातील सांगवी उमर , मेदनकल्लूर , शेळगांव ,शेखापूर ,तमलूर ,शेवाळा या पूरग्रस्त गावातील ९०२ कुटूंबातील २३७४ नागरिकांना नजिकच्या जिल्हा परिषद शाळां व मंगल कार्यालयांमध्ये स्थलांतरीत केले आहे.
चैनपूर, ढोसणी, मुजळगा, सुगाव, शेळगांव, कावळगांव, बळेगांव, भोकसखेडा, कोटेकलुर या गावांचा पाऊस व पुरामुळे संपर्क तुटलेलला आहे.
लोहा- मौजे उमरा गावाला पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे. ३०-४० कुटंबांना सुरक्षीत ठिकाणी स्थलांतरीत केले आहे. मौजे देऊळगाव येथील मुरलीधर केरबा राऊत यांची गाय मयत झाली आहे, मौजे आडगाव येथील शेतकरी अर्जुन मारुती क्षीरसागर यांचा एक बैल मयत, मौजे कलंबर बुद्रुक गोविददास तुळशिदास वैष्णव यांची गाय नाल्याच्या पाण्यात वाहून गेली आहे. नांदेड ते हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग रोड वाका तालुका लोहा नदीचे पाणी जास्त झाल्यामुळे पाणी रस्त्यावरुन जात आहे त्यामुळे नांदेड कडे येणारी वाहतूक बंद करण्यात आली एकेरी वाहतूक चालु केली आहे.
उमरी- तळेगांव ते बेलदरा ता. उमरी हा रस्ता जलमय झाल्यामुळे सद्यस्थितीत सदर रस्त्यावरुन संपर्क तुटला आहे. पर्यायी रस्ता उपलब्ध आहे, तळेगाव-बळेगाव, तसेच तळेगाव -गोरठा, तळेगाव-उमरी, तळेगाव-चिंचाळा, तळेगाव-अब्दुल्लापूर वाडी वरून येणाऱ्या नाल्यामुळे शेतपिकाचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. तसेच कोणतीही जीवितहानी झाली नाही. मौजे कुदळा ता.उमरी येथील शेतकरी श्री. हनुमंत मारोतराव जाधव यांचा बैल रात्रीच्या पावसात वीज पडून मयत झाला आहे. पावसामुळे रिसनगांव पांडुरंग नारायण हाबगुंडे यांचा बैल मृत्यू पावला आहे.
बिलोली- टाकळी ते आळंदी रस्त्यावरून पाणी जात असल्याकारणाने रस्ता बंद आहे, नवीन चिटमोगरा वाघजाळी जवळ तळ्या शेजारी कॅनल फुटला आहे खूप शेतकऱ्याचे पाणी वाहून सोयाबीनचे आतोनात नुकसान झाले आहे. मोजे लघुळ गावालगत असलेल्या नाल्याला पूर आल्यामुळे पाणी पुलावरून जात आहे, त्यामुळे बिलोली ते लघुळ जाणारा वाहतूक रस्ता बंद झाला आहे. कासराळी गावात पाणी मारोती मदीर, कुंभार गल्ली, खाटिक गल्ली, म्याक लोड गल्ली पाणी त्यांना सावध राहण्याकरिता गावचे सरपंच, पो.पा. तटामुक्ती अध्यक्ष, गावातील व्यक्ती याना कळविण्यात आले. बेलकोनि बू. ते बेल्कोनी खू. दरम्यान असणाऱ्या नाल्यावरील पुलावरून पाणी जात आहे, बीआयडीसी अंतर्गत असलेल्या पाचपिपळी ते कोल्हेबोरगाव पुलावरुन पाणी जात असल्यामुळे रस्ता बंद आहे. कोल्हेबोरगावात पाणी तुडुंब घरात शिरले आहे. येसगी गावात पुराचे पाणी त्यामुळे येथील राहिलेली नागरीक सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केले जात आहेत. किनाळा येथील नाल्याचे पाणी नरसी देगलूर रोड वरून जात होते परंतु आता पाणी कमी झाले. टाकळी खु. जवळ असणाऱ्या मन्याड नदीचे पाणी नरसी देगलूर रोडवर वाढत आहे. सर कासराळी येथील अशोक पिराजी चरकुलवार याचे राहते घर पावसामुळे पडले आहे. मौजे कुंभारगाव येथे दत्ता पंढरी संगेवार यांची गाय साप चावून मयत झाली आहे.
नांदेड- किकी-राहेगाव तालुका नांदेड पुलावरून अंदाजे १ फूट पाणी वाहत आहे.
मुखेड- मुळ भिंगोली गावात रहात आसलेल्या सर्व नागरीकांना स्थलांतरीत करण्यात आले आहे. मौजे बिल्लाली तालुका मुखेड येथे हणमंत केरबा कांबळे यांची म्हैस आज वीज पडून मयत झाली आहे, जांबु बु. तालुका मुखेड येथे गोविंद संभाजी कुदाडे यांची म्हैस आज वीज पडून मयत झाली आहे, मुखेड येथील देबडवार यांच्या शेड मधील म्हशी पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची माहिती आहे. शेड अजून पाण्यात आहे, मौजे सावरगाव पीर तालुका मुखेड येथील शेतकरी गंगाधर नारायण डूमणे यांची गाय पुराच्या पाण्यात वाहून मयत झाली, मौ. जाहूर येथे परशुराम हुल्लाजी रुद्रवाड यांच्या गाईचे गोरे वाहून मृत्यू पावली आहे. मौजे सांगवी बेनक तालुका मुखेड येथील शेतकरी माधव शिवसांभ मठपती यांची म्हैस पावसामुळे मयत झाली आहे. सज्जा होणवडज येथे गावात पाणी शिरले आहे लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले. शिरूर दबडे येथे खूप पाणी झाले असून नदीचे पाणी गावापर्यंत येऊन टेकलेले आहे गावातील बरेचसे लोक गावाचे वर पोलीस पाटलाच्या घराकडे येऊन थांबलेले आहेत,
किनवटः- सद्या जोराचा पाऊस असल्याने नदी नाल्यांना पूर येण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे सर्व नागरीकांना सतर्कतेचा इशारा देण्यात यावा असे सर्व नदीकाठावरील गावांचे तलाठ्यांना कळविले असुन तालुक्यांत सध्या जोरदार पाऊस चालु आहे. मांडवा येथील रहिवासी श्री वेंकट नारायण दासरवार शिवा दगडी
मंगाबोडी सर्वे नंबर तीन यांच्या शेतात आज सुमारे दीड वाजता बैलावर वीज पडून बैल मयत झाला आहे. किनवट ते बेल्लोरी (जुना रस्ता) वरील नाल्यावर एक लोडींग ऑटो पुराच्या पाण्यात वाहून जाऊन दोन व्यक्ती ऑटो मधून वाचले असून एक व्यक्ती लक्ष्मण बळीराम रणमले वय अंदाजे २२ वर्ष रा. खरबी हा बेपत्ता असून त्याचा शोध सुरु आहे. मौजे शिरपूर येथील व्यक्ती महादेव मारुती उरकुडकर यांच्या अंगावर वीज पडून मयत झाली. परोटी तांडा येथील रामराव जयवंत चव्हाण यांची गाय नाल्याला आलेल्या पुरात वाहत जाऊन मृत्यू पावली
हिमायतनगर- तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू झाला आहे, मौजे पिचोंडी शिवारात गट क्र. १७ मध्ये काम करीत असताना अचानक वीज कोसळून श्री. गजानन विठ्ठल मीराशे व प्रभाताई रघुनाथ मीराशे गंभीर जखमी झाले असून उपचारा साठी ग्रामीण रुग्णालय हिमायतनगर येथे दाखल करण्यात आले आहे.
धर्माबाद-शहरातील मानसरोवर कॉलनी बन्नाळी रोड भागात पाणी शिरले आहे. मंगनाळी गावात पाणी शिरलेले आहे. सिरजखोड धर्माबाद रस्ता सद्य परिस्थितीत बंद करण्यात आला
नांदेड जिल्हयातील व नांदेड जिल्ह्याला प्रभावीत करणारे धरण, लघु, मध्यम प्रकल्प, बॅरीकेज स्थितीः-
ऊर्ध्व पेनगंगा प्रकल्प ईसापुर टक्केवारी- 96.14% व 5 गेट.0.20 मीटर ने उचलून 3368 क्यूसेक्स (95.360) क्यूमेक्स च्या विसर्गाने धरणातील अतिरीक्त पाणी पेनगंगा नदी पात्रात सोडण्यात येत आहे.
येलदरी धरण ता. जिंतूर जि. हिंगोली- येलदरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असून तसेच खडकपूर्णा धरणातून विसर्ग चालू असल्याने आज दुपारी 4.00 वाजता येलदरी धरणाचे 2 गेट क्र.05,06 हे 0.5 मी. ने उघडण्यात केले आहेत. त्याद्वारे 4219.94 cusecs (119.496 Cumecs) इतका अधिक विसर्ग पूर्णा नदीपात्रात सोडण्यात आला आहे. Spillway गेट मुळे पुर्णा नदीपात्रात ( Spillway gate 8440+ Hydropower - 2700 Cusecs) असा एकुण 11140 Cusecs (316 Cumec) एवढा विसर्ग सोडला जात आहे. धरणात पाण्याची होणारी आवक पाहता विसर्ग कमी अथवा जास्त करण्याची कार्यवाही करण्यात येईल.
सिद्धेश्वर धरण ता. औंढा ना. जि. हिंगोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असून येलदरी धरणातून विसर्ग सुरू झाल्याने आज दुपारी 05.00 pm वाजता सिद्धेश्वर धरणाचे 4 गेट 0.3 मी. ने उघडण्यात आले आहेत. त्यामुळे धरणाचे एकुण 14 दरवाजे 0.3 मी. ने सुरू होऊन त्याद्वारे 11514 cusecs (326.037 Cumecs) इतका विसर्ग पूर्णा नदीपात्रात सोडण्यात येत आहे. Spillway गेट मुळे पुर्णा नदीपात्रात (Spillway gate -11514+ waste weir 734 Cusecs) असा एकुण 12258 Cusecs (346.821 Cumec) एवढा विसर्ग सोडला जात आहे. धरणात पाण्याची होणारी आवक पाहता विसर्ग कमी अथवा जास्त करण्याची कार्यवाही करण्यात येईल.
दिग्रस हाय लेवल बॅरीगेज- ता. पालम जि. परभणी 2 दरवाजे उघडले आहेत
अंतेश्वर उच्च पातळी बंधारा ता. लोहा जि. नांदेड-6 दरवाजे उघडले आहेत 59424.98 Cusecs
शंकरराव चव्हाण विष्णुपूरी प्रकल्प- 6 दरवाजे उघडले असुन 160000 Cusecs
बळेगाव उच्च पातळी बंधारा ता.उमरी, जि. नांदेड- 15 दरवाजे उघडले असुन 160000 Cusecs
निजामसागर प्रकल्प- चे 27 गेट उघडलेले आहे, Total outflow:- 2,20,256 Cusecs
अपर मानार प्राजेक्ट, लिंबोटी- उर्ध्व मानार धरणाचे 15 दरवाजे 1.5 m ने उघडने चालू असून 1998.61 cumec (70580.24 Cusecs) विसर्ग सुरू होणार आहे. अजून येवा चालू असल्याने परिस्थितीनुसार विसर्ग वाढविण्यात येईन. नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.
सध्या राज्य आपत्ती प्रतिसाद दल SDRF, CRPF, नांदेड मनपा व स्थानीक शोध व बचाव पथकाच्या माध्यमातुन शोध व बचाव कार्य चालु आहे. तात्पुरते स्थलांतरीत नागरीकांना आवश्यक ती मदत केली जात आहे. प्रशासन योग्य ती खबरदारी घेत आहे तसेच सर्व यंत्रणासोबत संर्पक व समन्वय ठेवुन जिल्हा प्रशासन कार्यवाही करत आहे.
No comments:
Post a Comment