लोकभवन येथे राज्यपाल देवव्रत आचार्य यांची उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्यासोबत सदिच्छा भेट - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Monday, January 26, 2026

लोकभवन येथे राज्यपाल देवव्रत आचार्य यांची उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्यासोबत सदिच्छा भेट

 


मुंबई, ( विशेष प्रतिनिधी उदय नरे)  : महाराष्ट्र राज्याचे मा. राज्यपाल श्री. आचार्य देवव्रत यांच्या वतीने लोकभवन, मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या “स्वागत समारंभा”साठी विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांना सस्नेह आमंत्रण देण्यात आले होते. याप्रसंगी राज्यपालांच्या पत्नी सौ. दर्शना देवी यांचीही उपस्थिती होती. या निमित्ताने विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मा. राज्यपाल श्री. आचार्य देवव्रत यांची सदिच्छा भेट घेतली.


या भेटीदरम्यान डॉ. गोऱ्हे यांनी “महाराष्ट्र विधानपरिषद शतक महोत्सव” या विशेष पुस्तकाची भेट राज्यपालांना दिली. या पुस्तकामध्ये महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शताब्दी वर्षानिमित्त विधानपरिषदेने संमत केलेली महत्त्वपूर्ण विधेयके, ठराव तसेच राज्याच्या विकासाला दिशा देणारी धोरणे यांचा समावेश आहे. महाराष्ट्राच्या लोकशाही परंपरेचा आणि विधानपरिषदेच्या योगदानाचा ऐतिहासिक आढावा या पुस्तकातून मांडण्यात आला आहे.


या सदिच्छा भेटीत राज्याच्या घटनात्मक परंपरा, लोकशाही मूल्ये आणि विधानपरिषदेच्या कार्याविषयी सकारात्मक चर्चा करण्यात आली. स्वागत समारंभाच्या निमित्ताने झालेली ही भेट अत्यंत सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडली.


यानंतर विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचीही सदिच्छा भेट घेतली. यावेळी प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या विकासात्मक वाटचालीसंदर्भात अनौपचारिक संवाद झाला.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News