माळेगाव यात्रेत सुशासन आणि गरीब कल्याण विषयावर प्रदर्शन - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Saturday, December 24, 2022

माळेगाव यात्रेत सुशासन आणि गरीब कल्याण विषयावर प्रदर्शन




नांदेड (जिमाका) दि. 24 : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त (आझादी का अमृत महोत्सव) तसेच केंद्र सरकारच्या ‘8 वर्षे सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणाची’ या विषयावर आधारित भव्य बहु-माध्यम प्रदर्शानास आज पासून शानदार सुरुवात झाली. या प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हा परिषदचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे यांच्या हस्ते झाले.  


यावेळी गटविकास अधिकारी शैलेश वावळे, सामाजिक कार्यकर्ते प्रविण पाटील चिखलीकर, माळेगावचे सरपंच हनुमंत धुळगुंडे, स्वच्छ भारत अभियानाचे मिलींद व्यवहारे, केंद्रीय संचार ब्यूरोचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी माधव जायभाये, इंद्रवदनसिंह झाला, सुमित दोडल आदी मान्यवर उपस्थित होते.


आझादी का अमृत महोत्सव व केंद्र सरकारचे ‘आठ वर्षे सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणाची’ या बहुमाध्यम प्रदर्शनातून आपल्याला स्वातंत्र्य लढ्याची सर्व माहिती तसेच केंद्र सरकारच्या 8 वर्षे कामगिरीची माहिती अत्यंत कमी वेळात आत्मसात होते, असे सांगून या अभियास संदीप माळोदे यांनी शुभेच्छा दिल्या.


भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाअंतर्गत नांदेड येथील केंद्रीय संचार ब्यूरोद्वारे या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासातील विविध महत्वाच्या घटना-घडामोडी सोबतच 1857 ते 1947 भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील महान स्वातंत्र्य सेनानी यांची जीवनगाथा व केंद्र सरकारच्या 8 वर्ष सेवाची माहिती बहूमाध्यम स्वरुपात माडण्यात आली आहे.


2 हजार 500 चौरस फुटावर आयोजित या आकर्षक सजावट बहूमाध्यम प्रदर्शात आझादी क्वेश्ट (भारत के हिरो) आनलाईन खेळ, डिजिटल स्क्रीन, एलईडी वाल्स, विविध स्वातंत्र्य लढ्यातील महान स्वातंत्र्य सेनानीचे कटाउट्स, सेल्फी बुथ आणि स्वाक्षरी वालच्या माध्यमातून अंत्यत सोप्या भाषेत माहिती देण्यात आली आहे. या पाच दिवशीय प्रदर्शनात सांस्कृतिक कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे. शाहीर रमेश गिरी यांच्या कलापथकाद्वारे देशभक्तीपर गितांतून मनोरंजन करण्यात येत आहे. हे प्रदर्शन सकाळी 9 ते रात्री 8 वाजेपर्यंत सर्वांसाठी मोफत खुले आहे. माळेगाव यात्रेस भेट देणाऱ्या नागरिकांनी प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केंद्र सरकारद्वारे करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News