राज्यपालांच्या हस्ते ग्लोबल ट्रेड अँड टेक्नॉलॉजी कौन्सिलच्या महाराष्ट्र शाखेचे उदघाटन - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Tuesday, November 7, 2023

राज्यपालांच्या हस्ते ग्लोबल ट्रेड अँड टेक्नॉलॉजी कौन्सिलच्या महाराष्ट्र शाखेचे उदघाटन

 



 


मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते मंगळवारी (दि. ७) राजभवन येथे ग्लोबल ट्रेड अँड टेक्नॉलॉजी कौन्सिल ऑफ इंडिया या व्यापार तंत्रज्ञान परिषदेच्या महाराष्ट्र शाखेचे उदघाटन करण्यात आले. राज्यपालांच्या हस्ते यावेळी परिषदेच्या महाराष्ट्र शाखेच्या तसेच वर्ल्ड बिझनेस कॉन्क्लेव्हच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले.  राज्यपालांच्या हस्ते संस्थेच्या मार्गदर्शकांच्या सत्कार करण्यात आला.


            यावेळी परिषदेचे अध्यक्ष  डॉ गौरव गुप्ता, सल्लागार पिनल वानखेडे, महाराष्ट्र शाखेच्या संस्थापक ऐश्वर्या वानखेडे, उपाध्यक्ष विक्रांत चंदवाडकर, डॉ संदीप मारवा, डॉ कल्पना सरोज व कौन्सिलचे पदाधिकारी उपस्थित होते.


            कौन्सिलच्या महाराष्ट्र शाखेच्या वतीने विविध देशांच्या दूतावासाच्या सहकार्याने राज्यात गुंतवणूक व व्यापार वाढविण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे सांगण्यात आले.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News