मेंदूला चालणा देण्यासाठीच्या पाढे पाठांतर व बुद्धीबळ स्पर्धांतून विद्यार्थ्यांनी प्रज्ञा अविष्कार फुलविला -गट शिक्षणधिकारी अनिलकुमार महामुने - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Monday, March 2, 2026

मेंदूला चालणा देण्यासाठीच्या पाढे पाठांतर व बुद्धीबळ स्पर्धांतून विद्यार्थ्यांनी प्रज्ञा अविष्कार फुलविला -गट शिक्षणधिकारी अनिलकुमार महामुने

 


किनवट : मराठी बालसंस्कृतीचा अमूल्य वारसा जतन व संवर्धन करणे, बालवयात बुध्दी आणि उच्चार यात जलद प्रगती साधणे, स्मरणशक्ती एकाग्रता, आत्मविश्वास, संयम आणि दुरदृष्टी यासारखे महत्वाचे जीवन कौशल्य विकसीत करणे, मेंदूला चालना देणे, मानसिक आरोग्य सुधारणे, सर्जनशीलता व रणनीती तयार करण्याची क्षमता सुधारणे याकरिता आयोजित पाढे पाठांतर व बुध्दीबळ तालुकास्तरीय स्पर्धेत सहभागी होऊन विद्यार्थ्यांनी आपल्या प्रज्ञा, प्रतिभेचा अविष्कार फुलवीला आहे. असे प्रतिपादन गट शिक्षणधिकारी अनिलकुमार महामुने यांनी केले.

          जिल्हा परिषद नांदेडच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या प्रेरणेने शिक्षणाधिकारी (प्राथमिक) वंदना फुटाणे यांच्या मार्गदर्शनाखाली गट शिक्षणाधिकारी अनिलकुमार महामने यांनी शिक्षण विभाग पंचायत समिती किनवटच्या वतीने मातोश्री कमलताई ठमके इंग्लिश स्कुल, कोठारी (चि.) येथे जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी तालुकास्तरीय पाढे पाठांतर स्पर्धा व बुद्धिबळ स्पर्धांचे आयोजन केले होते. बक्षीस वितरण प्रसंगी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी प्रताप राठोड , केंद्र प्रमुख रमेश राठोड उपस्थित होते.स्पर्धा संयोजक केंद्र प्रमुख उत्तम कानिंदे यांनी सूत्रसंचालन केले . केंद्रप्रमुख राम बुसमवार यांनी आभार मानले. स्पर्धेतील यशवंत पुढील प्रमाणे :

पाढे पाठांतर स्पर्धा :

गट पहिला : इयत्ता पहिली ते चौथी : प्रथम-संतोष चंचलवाड (जिपप्राशा कोपरा), द्वितीय-पृथ्वीराज कैलास राठोड ( जिपप्राशा दगडवझरा) , तृतीय- आरुष कनकावार (जिपकेंप्राशा मांडवा)

गट दुसरा : इयत्ता पाचवी ते सातवी : प्रथम - वेदिका संजय चव्हाण ( जिपप्राशा परोटी तांडा) , व्दितीय - स्वस्तिक अर्जूल राठोड ( जिपकेंप्राशा खंबाळा ) , तृतीय- सार्थक धम्मदीप धुप्पे

गट तिसरा : इयत्ता आठवी ते दहावी : प्रथम- हिंदवी प्रवीण सुर्यवंशी (जिपहा कोसमेट) व व्दितीय - सुरज मारोती भसमे (जिपप्राशा कनकवाडी )



बुद्धिबळ स्पर्धा :

गट पहिला : इयत्ता 1 ली ते 4 थी : प्रथम - दुर्वा संदीप धुमाळ (जिपप्राशा सावरकरनगर) , व्दितीय - सक्षम सुनिल चव्हाण (जिपप्राशा अंबाडी) , तृतीय - निशांत संदीप कुमरे (जिपप्राशा सालाईगुडा) , 

गट दुसरा : इयत्ता 5 वी ते 7 वी : प्रथम - नोमान अकबर शेख (जिपप्राशा सारखणी) , निराकार अंकुश चमकुरे ( जिपप्राशा सिंगारवाडी) , तृतीय - अविनाश इंद्रसिंग राठोड (जिपप्राशा सावरगाव तांडा) ,

गट तिसरा : इयत्ता 8 वी ते 10 वी : प्रथम- हिंदवी प्रवीण सूर्यवंशी (जिपहा कोसमेट) व द्वितीय- सुरज मारोती भसमे (जिपप्राशा कनकवाडी)

      पाढे पाठांतर स्पर्धेकरिता संयोजक केंद्र प्रमुख प्रमोद कांबळे , सतीश शिरगुरवार व दत्तात्रय संदुलवार , परिक्षक : आशीर्वाद कोतपेल्लीवार , बाळासाहेब तिडके , नरेंद्र कळंबे ,गौरव राजूरकर , नितीन सावरगावे , जगन्नाथ बिरकुलवार आणि बुद्धिबळ स्पर्धेकरिता संयोजक : राम बुसमवार , जगदीश कोमरवार व रमेश खुपसे , पंच : विष्णू जाधव , सुमेध भवरे , प्रेमकुमार तांदळे यांनी काम स्पर्धा यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

पाढे पाठांतर स्पर्धेत मांडवा येथील इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांने सदोतीस चा पाढा म्हटला तर परोटीतांडा येथील विद्यार्थिनीने एक्यांशीचा पाढा म्हटला हे विशेष 

     


No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News