हिमायतनगर : तालुक्यातील एकंबा येथील प्रतिष्ठित ज्येष्ठ नागरिक लक्ष्मीबाई खंडूजी कानिंदे (वय 96 वर्षे) यांचे सोमवारी (ता.23 फेब्रुवारी 2026 ) दुपारी 4.00 वाजता वृद्धापकाळाने राहत्या घरी निधन झाले.
मंगळवारी (ता.24 फेब्रुवारी 2026 ) दुपारी 1.00 वाजता त्यांच्या पार्थिवावर मौजे एकंबा येथील त्यांचे शेतात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
त्यांचे पश्चात मुले , सुना, मुली , जावई , नातू पंतू असा मोठा गोतावळा असून भीमराव खंडूजी कानिंदे (माजी सरपंच एकंबा) , भोजराज खंडूजी कानिंदे , अभि. भरतकुमार कानिंदे ( माजी श्रामणेर तथा बानाईचे कार्यकर्ते) , गौतम खंडूजी कानिंदे , मंजुताई स्मृति. घनश्याम पाटील व आशाताई अशोक येरेकार यांच्या त्या मातोश्री आणि छत्रपती संभाजीनगर येथील सा.बां. विभागाचे निवृत्त कार्यकारी अभियंता अशोक येरकार यांच्या त्या सासूबाई होत.




No comments:
Post a Comment