माहूर ( नांदेड ) : अखिल भारतीय शिक्षक साहित्य-कला-क्रीडा मंडळ मराठवाडा विभाग आयोजित राज्यस्तरीय कराओके गीतगायन स्पर्धा "कोण होणार महाराष्ट्राचा महागायक" श्रीक्षेत्र माहूर जिल्हा नांदेड येथील श्री.साईनाथ महाराज वसमतकर यांच्या आनंद दत्तधाम आश्रमात उत्साहात पार पडली. स्पर्धेचे उद्घाटन नांदेडचे योजना शिक्षणाधिकारी दिलीपकुमार बनसोडे यांनी केले.मी अध्यक्षस्थानी मंंडळाचे संस्थापक राज्याध्यक्ष नटराज मोरे होते.
यावेळी राज्यसचिव हर्षल साबळे, मराठवाडा विभागीय अध्यक्ष रमेश मुनेश्वर, सचिव शेषराव पाटील, नागपूर विभागीय अध्यक्ष नरेंद्र कन्नाके, नांदेड जिल्हाध्यक्ष मिलिंद जाधव, पत्रकार नंदू संतान, सरफराज दोसाणी, बालाजी कोंडे आदी मान्यवर, मंडळाचे प्रमुख उपस्थित होते. शिक्षकांसाठी असलेल्या या महाअंतिम स्पर्धेत महाराष्ट्रातील मराठवाडा, कोकण, नागपूर, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागातील प्रत्येकी सात अशा ४२ स्पर्धकांनी आपल्या विभागाचे प्रतिनिधीत्व केले.
अत्यंत चुरशीच्या झालेल्या स्पर्धेत कोकण विभागाच्या ठाणे जिल्ह्यातील रविंद्र तरे यांनी बाजी मारत विजेते पदाला गवसणी घातली तर मराठवाडा विभागाचे छत्रपती संभाजीनगरचे सिराज पठाण उपविजेता ठरले. तृतीय क्रमांकाचे मानकरी सिद्धार्थ वाघ ठरले. उत्तेजनार्थ पुरस्कारात श्रीमती रजनी गोडबोले- ठाणे, विलास नरवाडे नांदेड, संतोष चलोदे रत्नागिरी, मुन्ना थोरात नांदेड, निलेश दोनाडकर चंद्रपूर यांनी आपल्या आवाजाची छाप उमटवत महाराष्ट्रातील महागायकात स्थान पटकावले. विभागातून प्रथम हर्षल साबळे ( कोकण ) , नंदकुमार उबाळे ( पुणे ) , प्रीती भरणे ( अमरावती ) , सुवर्णा केळगिरे ( मराठवाडा ) , सुनील सिसोदे ( नाशिक ) , घनशाम मेश्राम ( नागपूर )
परीक्षक म्हणून संगीततज्ज्ञ राजू जाधव, संगीत विशारद सुरेश पाटील, गायन विशारद भारत कोडापे यांनी उत्कृष्टरित्या काम केले. सहभागी सर्वांनाच सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुपेश मुनेश्वर आणि फाल्गुनी उपरीकर यांनी केले. माहूर तालुकाध्यक्ष मिलिंद कंधारे यांनी आभार मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शितल गौरखेडे, मुन्ना थोरात, किरणकुमार वाघमारे, मनोज बारसागडे, बाबुराव माडगे, सुधाकर चवटे, ज्ञानेश्वर कऱ्हाळे पाटील, प्रवीण वाघमारे, सुरेशकुमार शेरे, सागर चेक्के, भाग्यवान भवरे, डॉ. अरुण धकाते, प्रा. विनोद कांबळे, जितेंद्र वर्मा, यु.टी.पवार, पांडुरंग शेरे, किनवट तालुकाध्यक्ष रामस्वरूप मडावी आदींनी परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment