किनवट : येथील भूमिपुत्र उभरता अभिनेता शुशांत ठमके यांचा बॉलीवूड चित्रपट 'पिंटू की पप्पी' 21 मार्च रोजी जगभर प्रदर्शित होत आहे. यातील " अजय अतुल " जोडीपैकी अजय गोगावले यांनी गायिलेल्या एका गाण्याची ऑनलाईन लाँचिंग 18 मार्च रोजी मातोश्री कमलताई ठमके शैक्षणिक संकुल कोठारी (चि) येथे सिनेसृष्टीतील प्रसिद्ध 50 कलावंतासह प्रख्यात नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्य व नृत्यांगणा माधुरी पवार यांचे "लाईव्ह परमन्सेस"चा आनंद घेण्यासाठी सर्व सिने संगीत प्रेमिंनी बहुसंख्येनं उपस्थित राहावे, असे आवाहन पिंटू के पप्पा अर्थात शुशांतचे वडील अभियंता प्रशांत ठमके यांनी केले आहे.
येथील शासकीय विश्राम गृहात आयोजित पत्रकार परिषदेत अभि. ठमके बोलत होते. यावेळी सिने स्तंभलेखक उत्तम कानिंदे , महेंद्र नरवाडे यांची उपस्थिती होती. अभिनेता म्हणून पहिल्यांदाच येथील शुशांत प्रशांत ठमके रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. विधी आचार्य निर्मित , शिव हरे लिखित-दिग्दर्शित, प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्य यांच्या मार्गदर्शनात तयार झालेला बीग बजेट बॉलीवूड चित्रपट "पिंटू की पप्पी " हा 21 मार्चला वेगवेगळ्या पाच भाषेत जगभर एकाच वेळी प्रदर्शित होणार आहे. यातील नऊ गाणी संगीत नृत्याच्या अविष्काराने देशभर प्रचंड गाजत आहेत.
किनवटचा भूमीपुत्र रूपेरी पडद्यावर झळकतोय यानिमित्त बॉलीवूड मधील 50 सिनेस्टार सह महानायक अमिताभ बच्चन पासून आजच्या पुष्पा-2 पर्यंतच्या सर्व अभिनेत्यास नृत्य दिग्दर्शनाचे धडे देणारे प्रख्यात नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्य व प्रसिद्ध नृत्यांगणा माधुरी पवार किनवटच्या भूमिवर मातोश्री कमलताई ठमके शैक्षणिक संकुल कोठारी (चि) येथे मंगळवारी 18 मार्च रोजी सायंकाळी साडेपाच वाजतापासून पुढे "लाईव्ह परमार्न्सेस " सादर करणार आहेत.
किनवट तालुक्याच्या इतिहासातील पहिल्याच या भव्यदिव्य मंचावर सिनेकलावंतांच्या संगीत कला आणि नृत्याचा नजारा सादर होणार आहे. किनवटकरांचे मुख्य आकर्षण ठरणाऱ्या या कार्यक्रमात नवोदित चित्रपट अभिनेता शुशांत ठमके, अभिनेत्री जान्या जोशी , विधी यादव यांच्यासह सिनेसृष्टीतील 50 कलाकारांच्या कलेची मेजवाणी याअविस्मरणीय क्षणी मिळणार आहे. यावेळी " अजय अतुल जोडीतील " अजय गोगावले यांनी गायिलेल्या एका गाण्याची ऑनलाईन लाँचिंग येथून होणार आहे. किनवटच्या इतिहासातील ह्या ऐतिहासिक क्षणी आपल्या भूमिपुत्राला प्रोत्साहन देण्यासाठी आपण परिवारासह उपस्थित राहून या सोनेरी क्षणाचे साक्षीदार व्हावे, असे आवाहन आयोजक अभियंता प्रशांत ठमके यांनी पत्रकार परिषदेत केले.
No comments:
Post a Comment