पूरपरिस्थितीमुळे अडकलेल्या ६६ नागरिकांना सुखरूपपणे काढले बाहेर ; होमगार्ड जवानांनी लावली जीवाची बाजी - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Monday, September 1, 2025

पूरपरिस्थितीमुळे अडकलेल्या ६६ नागरिकांना सुखरूपपणे काढले बाहेर ; होमगार्ड जवानांनी लावली जीवाची बाजी




नांदेड ता. १ सप्टेंबर:- पुरपस्थितीमुळे जिल्ह्यात सर्वत्र नागरिक पुराच्या पाण्यात अडकले होते. मदतीसाठी सर्व यंत्रणा धावपळ करीत असताना नांदेड जिल्ह्यातील होमगार्डची टीम सुद्धा तत्परतेने धाऊन गेली. त्यांनी ६९ नागरिकांना पुरातून बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी हलविले.


    जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाल्यानंतर जिल्हाधिकारी राहूल कर्डिले यांनी तातडीने बचाव व मदत कार्य हाती घेतले. जिल्हा आपती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्याकडून होमगार्डची एक टिम धर्माबाद येथे उपविभागीय अधिकारी यांच्याकडे रवाना करण्याचे निर्देश पोलीस अधीक्षक कार्यालय यांना दिले.त्यानुसार अप्पर पोलीस अधीक्षक,नांदेड तथा होमगार्डचे जिल्हा समादेशक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली दोन अधिकारी व ९ जवान यांची टिम तत्परेने २९ रोजी धर्माबाद येथे रवाना झाली. 


या मध्ये प्र. केंद्र नायक संतोष जैस्वाल यांच्या नेतृत्वाखाली वरिष्ठ पलटन नायक बशिरोद्दीन शेख, होमगार्ड जवान सय्यद इम्रान अली, शेख फेरोज शेख इमाम, माधव कोमटवार, बालाजी गवंडेल, मादास हिवरे, शिवाजी कोकरे, प्रभाकर कोमटवार, पृथ्वीराज कंधारे व हनुमान घोडके यांचा समावेश होता.


उपविभागीय अधिकारी स्वाती दाभाडे तसेच तहसिलदार सुरेखा स्वामी यांच्या मार्गदर्शना खाली होमगार्ड टिम हुनगुंदा, संगम मनूर येथे पाठविण्यात आली. महसूल प्रशासनाकडे ओबीएम मशिनची फायबर बोट होती. सैन्य दलाची टिम देखील तेथे कार्यरत होती.पण बोट चालविणारे प्रशिक्षित कुशल तंत्रज्ञ नव्हते. राज्य आपती व्यवस्थान आणि होमगार्ड आपती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण घेतलेले होमगार्ड जवान लगेच सरसावले. परिस्थितीचे  गांभीर्य लक्षात घेऊन मोठी रिस्क घेत त्यांनी बोट सुरु करून हुनगंदा येथे पुरात अडकलेल्या  ६३ नागरिकांना बाहेर काढून बोटीद्वारे सुरक्षित ठिकाणी हलविले.


    संगम मनूर येथे महादेव मंदिराला पुराने वेढा घातला होता. त्यात मंदिरात महंत यांच्यासह सहा नागरिक आडकून पडले होतो. त्यांना देखील दिलासा देत पुरातून बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी हलविले.


    तहान भूक विसरून होमगार्ड जवान यांनी आपल्या जीवाची बाजी लावत आपले कर्त्तव्य प्रामाणिकपणे पार पाडले. 

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News