हिमायतनगर (नांदेड) : तालुक्यातील मौजे एकंबा येथील ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या गैरव्यवहारा संदर्भात मागील दिड वर्षापासून दोन वेळा आमरण उपोषण करुन सुध्दा भ्रष्टाचारी ग्रामसेवक , सरपंच, उपसरपंच व रोजगार सेवक हे शासकीय चौकशीअंती दोषी सिध्द होवून सुध्दा यांच्यावर कुठल्याही कार्यवाही होत नसल्यामुळे दि. 29/09/2025 पर्यत दोषीवर निलंबनाची कार्यवाही करावी अन्यथा दि. 30/09/2025 रोजी ग्रामपंचायत एकंबा कार्यालयासमोर सामूहिक आत्मदहन करणार असल्याचा इशारा ग्रामस्थांनी हदगावचे उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की सदरील ग्रामस्थांनी ग्रामविकास मंत्री ,पालकमंत्री , जिल्हाधिकारी यांचे सह जिल्हा व तालुकास्तरावर सर्व संबंधित अधिकारी यांना 22 वेळा तक्रार , निवेदन व त्यानंतर झालेल्या पंचनाम्या नेतर देखील मौजे एकंबा ता. हिमायतनगर येथील ग्रामपंचायतीचे तत्कालीन ग्रामसेवक आर. के. खिल्लारे, सरपंच सी. अश्विनी प्रभु कल्याणकर, उपसरपंच दत्ता मुंजाराम कॉकेवाड, व रोजगार सेवक टिकाराम केशव कदम, यांच्या विरोधात गैरव्यवहार , शासकीय निधीचा अपहार , नरेगा योजनेची विहिर , पाणी फिल्टर मशिन , 15 व्या वित्त आयोगातुन अंगणवाडीतील खेळाचे साहित्य , दलित वस्ती मधील कामे अंतर्गत नाली व इतर गावांतील विकास कामाचे अंदाज पत्रक तयार न करता परस्पर बिले उचलली , 30 महिण्यापासुन मासिक व ग्रामसभा घेतली नाही. पदाचा दुरुउपयोग करुन 40 ते 45 लाखाचा गैरव्यवहार केला अशा अनेक ग्राम पंचायतीशी संबंधीत प्रकारा बाबत गेल्या दिड वर्षापासुन 3 वेळा आमरण उपोषण करुन या संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या स्तरावरुन गावकऱ्या समक्ष व पंचासमक्ष चौकशी करुन अहवाल प्राप्त झाला. परंतु चौकशी अहवाला मध्ये कुठल्याही प्रकारची कामे झालेली नाहीत. व मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचे स्पष्ट होवुन सदरील भ्रष्ट्राचारी ग्रामसेवक व सरपंच, उपसरपंच व रोजगार सेवक यांच्यावर कुठल्याही प्रकारची कायदेशीर कार्यवाही झाली नाही.
ग्राम पंचायतीच्या मालमत्तेवर फसवणुक करुन विश्वासघात केला. परंतु जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी यांचे स्वीय सहाय्यक श्री नागमवाड व तत्कालीन गटविकास अधिकारी श्री जाधव व तसेच शासकीय कर्मचारी यांनी भ्रष्टाचाऱ्यांना वेळोवेळी पाठीशी घालुन हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला म्हणुन सदरील गट विकास अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करावी आणि शासकीय चोरास पाठबळ देणाऱ्या गुन्ह्या खाली कायदेशीर कार्यवाही करुन व भ्रष्टाचारी लाचखोर ग्रामसेवक आर. के. खिल्लारे, याला कायमस्वरुपी सेवेतून निलंबीत करावे,
यासंदर्भात आपल्या स्तरावरुन उच्चस्तरीय चौकशी गावकऱ्यांसमक्ष करुन फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा आजतागायत शासकीय सेवेत झालेल्या गैरव्यवहाराचा आढावा घेवुन कायमस्वरुपी निलंबीत करावे, व भ्रष्ट्राचारी रक्कम व साहित्य वसुल करुन ग्राम पंचायतला मिळवुन द्यावे. दि. 29/9/2025 पर्यंत कोणतीही कार्यवाही न केल्यास दि. 30/09/2025 रोजी ग्राम पंचायत कार्यालय, एकंबा ता. हिमायतनगर समोर सामुहिक आत्मदहन करणार याची प्रशासनाने नोंद घ्यावी. असे निवेदन यशवंत मारोती वाघमारे,रविकुमार भौजु कानिदे,श्रीरंग दत्ता सुर्यवंशी,राजु चंद्रकांत देशपांडे,वैभव राम कंदेवाड,रमेश हनमंतराव लुम्दे, गणेश दिगांबर घुंगराळे या ग्रामस्थानी हदगावचे उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे यांना निवेदनाद्वारे दिली आहे .




No comments:
Post a Comment