किनवट नगर परिषद निवडणूकीसाठी मतदान यंत्र सिलिंग प्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Sunday, November 30, 2025

किनवट नगर परिषद निवडणूकीसाठी मतदान यंत्र सिलिंग प्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली

 



किनवट : येथील नगर परिषदेच्या प्रशासकिय इमारतीत नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ करिता मतदान घेण्यासाठी मतदान यंत्रे सिलिंग प्रक्रिया अधिकारी , उमेदवार व प्रतिनिधींच्या उपस्थितीत यशस्वीपणे पार पडली.

     किनवट नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या अनुषंगाने  राज्य निवडणूक आयोगाने वेळापत्रकानुसार निश्चित केलेल्या मंगळवारी (ता. २ डिसेंबर २०२५)  मतदानासाठी  निवडणूक निरीक्षक तथा हिंगोलीचे उप जिल्हाधिकारी (सा) अनिल माचेवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत तहसिलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. शारदा चोंडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली 29 मतदान केंद्राचे व राखीव मतदान यंत्र मतपत्रिका लावून तयार करण्यात आली . उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधि व राजकीय पक्षाचे पदाधिकारी/प्रतिनिधि यांच्या समक्ष मतदान यंत्र सीलिंग करून स्ट्राँग रूम मध्ये सुरक्षित ठेवण्यात आले. यावेळी उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधी यांनी प्रभागनिहाय मतदान केंद्रासाठीच्या  मतदान यंत्रावर  ( इव्हीएम मशिनवर ) अभिरूप मतदान (मॉक पोल) करून खात्री केली . यावेळी त्यांच्या शंका व  प्रश्नांचे सीलिंग साठी नियुक्त कर्मचारी यांनी माहिती देऊन  समाधान केले.

     निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. शारदा चौंडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याधिकारी तथा सहायक निवडणूक अधिकारी विवेक कांदे, नायब तहसिलदार तथा अतिरिक्त सहायक निवडणूक चंद्रशेखर सहारे, नायब तहसीलदार म. रफिक म. बशीरोद्दीन, नायब तहसीलदार बालाजी फोले, निलेश राठोड  मास्टर ट्रेनर मल्लिकार्जून स्वामी व  उत्तम कानिंदे  यांनी सीलिंगसाठी नियोजनबद्ध  कार्यक्रम आखून त्यानुसार सदर प्रकिया अत्यंत शांततेत व सुरक्षित पार पाडली. यावेळी पोलिस निरिक्षक गणेश कराड यांचे नेतृत्वात चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता.

         

मंगळवारी (ता.२) सकाळी ७ :३० ते सायंकाळी ५:३० या वेळेत प्रत्येक पात्र मतदाराने  मतदान केंद्रावर जाऊन निर्भयपणे आपला मताचा हक्क बजावावा.मतदान करताना कोणतीही अडचण अडचण असल्यास केंद्रावरील नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्याची मदत घ्यावी. शांतता आणि सुव्यवस्थेचे पालन करून ही निवडणूक प्रक्रिया यशस्वी करावी, असे आवाहन किनवट नगरपरिषदेच्या निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. शारदा चौंडेकर व मतदार जनजागृती कक्ष (स्वीपचे नोडल अधिकारी तथा गट शिक्षणाधिकारी अनिलकुमार महामुने यांनी केले आहे.



No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News