नांदेड दि. 21 जून : यंदा जून महिन्याचा शेवटचा आठवडा आला असून अद्याप आवश्यक तेवढा पाऊस पडला नाही तसेच नांदेड जिल्ह्यातील सर्वच भागात उन्हाची तीव्रता अधिक असल्यामुळे आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील तरतुदीनुसार नांदेड जिल्ह्यातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या इयत्ता पहिली ते बारावीच्या शाळा कॉलेज सकाळच्या सत्रात म्हणजे सकाळी 8 ते दुपारी 12.30 या वेळेत सोमवार 22 जून सोमवारपासून भरविण्यात येणार आहेत असे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी कळविले आहे. इंडियन बहुजन टीचर्स असोसिएशन (इब्टा) महाराष्ट्र राज्य शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेच्या मागणीला यश आल्याने या निर्णयाविषयी विद्यार्थी, शिक्षक व पालकांनी समाधान व्यक्त केले आहे.
त्यानुसार नांदेड जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनाच्या आणि सर्व माध्यमाच्या मराठी इंग्रजी उर्दू राज्य मंडळ सीबीएससी व इतर मंडळाच्या सर्व शाळा व्यवस्थापन यांनी याची नोंद घेऊन 22 जून 2026 सोमवारपासून पुढील आदेशापर्यंत इयत्ता पहिली ते बारावीच्या शाळेचे वर्ग सकाळी आठ ते साडेबारा यावेळेत भरविण्यात यावेत असे शिक्षण विभागातर्फे सांगण्यात आले आहे.
इंडियन बहुजन टीचर्स असोसिएशन (इब्टा) महाराष्ट्र राज्य शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेने दिले होते निवेदन
इंडियन बहुजन टीचर्स असोसिएशन (इब्टा) महाराष्ट्र राज्य शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेने ता 10 जून 2026 रोजी दिलेल्या निवेदनात असे नमूद केले होते की 'राज्यासह नांदेड जिल्ह्यात आणखी म्हणावा तसा पाऊस न झाल्याने प्रचंड उष्णता व उकाडा जाणवत आहे. जिल्ह्यातील बहुतांश शाळांत विद्युत पुरवठा व पंख्यांच्या व्यवस्था नाहीत. नांदेड जिल्हा हा विदर्भालगत उष्णता प्रमाण क्षेत्र आहे. उष्णतेमुळे विदर्भातील शाळा ३० जुलैला प्रारंभ होत आहेत. नांदेड जिल्ह्याची परिस्थिती विदर्भासारखीच आहे. त्यामुळे नांदेड जिल्ह्यात देखील प्रचंड उष्णता, उकाडा व पाणीटंचाईपासुन विद्यार्थी व शिक्षकांचे संरक्षण करण्यासाठी 1 जुलै 2026 पर्यंत नांदेड जिल्ह्यातील शाळा सकाळ सत्राव 07.30 ते 12.30 या वेळात भरविण्यात याव्यात ही नम्र विनंतीः धन्यवाद ! "
या निवेदनावर इब्टाचे केंद्रीय जिल्हाध्यक्ष बालासाहेब लोणे, जिल्हा सरचिटणीस निलेश गोधने , जिल्हा उपाध्यक्ष माधव कांबळे, विजय इंदूरकर , शेख अहमद व जिल्हा सह चिटणीस प्रकाश चांडोळकर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
इंडियन बहुजन टीचर्स असोसिएशन (इब्टा) महाराष्ट्र राज्य शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेच्या मागणी प्रमाणे मा. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले साहेबांनी घेतलेल्या या निर्णयाबद्दल आम्ही त्यांचे मनस्वी आभार मानतो. या महत्वपूर्ण निर्णयाबद्दल विद्यार्थी, शिक्षक व पालकांनी आनंद व्यक्त केला आहे.
- बालासाहेब लोणे ,
केंद्रीय जिल्हाध्यक्ष , इब्टा ,




No comments:
Post a Comment