नांदेड : शहरातील चांदोजी पावडे मंगल कार्यालयात पंचशील प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित चौथ्या बौद्ध विवाह मेळाव्यात 27 जोडण्यांचे विवाह नियोजित वेळेवर लावून समाजाला एक आदर्श दिला आहे.
सामाजिक समता, बंधुता एकतेचा संदेश देत समाजातील गोरगरीब,कष्टकरी, सर्वसामान्य जनतेचा विवाहासाठी होणारा अनाठायी खर्च वाचावा, तोच पैसा समाजाने आपल्या परिवाराचे जीवनमान उंचावण्यासाठी खर्च करावा यातून समाजामध्ये एकी,आपुलकी,प्रेम, सहानुभूती वाढावी या उदात्त हेतूने नांदेड शहरातील पंचशील प्रतिष्ठानच्या वतीने चौथा बौद्ध विवाह मेळावा शुक्रवारी (ता.5 जुन ) दुपारी 12.30 वाजता भदंत पंय्याबोधी थेरो यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भारतीय बौद्ध महासभेचे बौद्धाचार्य सा. ना.भालेराव व सुरेश लोकडे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या ऐतिहासिक मेळाव्यामध्ये 27 जोडपे परिणयबद्ध झाले.
प्रारंभी तथागत गौतम बुद्ध आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या रूपांना मान्यवरांनी पुष्पापूर्ण वंदन केले. यावेळी उद्घाटक म्हणून मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार, अध्यक्ष म्हणून बीएसएनएलचे उपमहाप्रबंधक आ.बी.मादळे, स्वागताध्यक्ष म्हणून छत्रपती संभाजीनगरचे निवृत्त कार्यकारी अभियंता अशोकराव येरेकर, विशेष अतिथी म्हणून प्रफुल्ल सावंत, रमेश सोनाळे, बापूराव गजभारे, मनीषभाऊ कावळे, पंढरीनाथ बोकारे, अभि.प्रशांत इंगोले, प्रभू सावंत, आशाताई येरेकर, अनिताताई इंगोले, दादासाहेब शेळके, भारतीय बौद्ध महासभा जिल्हाध्यक्ष गणपतराव गायकवाड, हौसाजी वारघडे, अभि. वसंत वीर, अभि. अनिलकुमार आठवले, अभि. यशवंतराव गच्चे, डॉ. दिलीप फुगारे, महेंद्र कावळे, निवृत्त उप विभागीय पोलीस अधिकारी विजय डोंगरे, एम. डी. थोरात, अभि. अशोक गायकवाड, दैनिक सम्राटचे जिल्हा प्रतिनिधी संभाजी सोनकांबळे, लॉर्ड बुद्धा टी. व्ही. चे जिल्हा प्रतिनिधी सदाशिव गच्चे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
या विवाह मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी संयोजक सेवानिवृत्त अभियंता भरतकुमार कनिंदे, अभि. भीमराव धनजकर, सचिव अभि. आर. बी.मादळे, उपाध्यक्ष भगवानराव धबडगे, सहसचिव यशवंतराव उबारे, कोषाध्यक्ष ऍड.गौतमराव कांबळे, निमंत्रक अभि. प्रशांत ठमके तसेच कोंडीबा वासाटे, वसंत वीर, विजय रावळे, प्रेमदास घुले, गुणवंत भगत, विजय पोपलवार, टि.पी.वाघमारे, आर.सी.कांबळे,मिसाळे सर, अशोकराव गायकवाड, डी.डी.भालेराव, रमाबाई पाटील, सुनीता कानिंदे, कुसुम धोटे, जयश्री भगत, निर्मला नरवाडे, दिक्षाताई नांगरे, सुनीता वासाटे, प्रतिमा भगत, पुष्पा भरणे, शैलजा लोणे, विमल किर्तने,मंदा पाटील, जनाबाई पोपलवार आदींनी परिश्रम घेतले.
योग्य नियोजनाबद्दल उपस्थितांकडून कौतुकातुकाचा वर्षाव
पंचशील प्रतिष्ठान नांदेड च्या वतीने आयोजित ऐतिहासिक चौथे बौद्ध विवाह मेळाव्यामध्ये सर्व व्यवस्था ही अतिशय चोखपणे करण्यात आली होती. यामध्ये उपस्थित जनतेच्या पिण्याच्या पाण्याची, जेवणाची, बसण्याची व्यवस्थित व्यवस्था करण्यात आल्यामुळे तसेच विवाह अगदी वेळेवर पार पाडला त्यामुळे या विवाह मेळाव्याच्या चोख नियोजनाबद्दल उपस्थित जनतेकडून संयोजन समितीचे कौतुक करण्यात आले.








No comments:
Post a Comment