किनवट : येथून जवळच असलेल्या घोटी येथील ज्येष्ठ नागरीक विश्वनाथ रामा लढे (वय 85 वर्षे ) यांचे वृद्धापकाळाने राहत्या घरी गुरुवारी (ता. 28 मे 2026 ) दुपारी 2.15 वाजता निधन झाले. विद्यानगर, घोटी येथील त्यांच्या निवासस्थानापासून शुक्रवारी (ता. 29 मे 2026) सकाळी 10.00 वाजता त्यांच्या पार्थिवाची प्रेतयात्रा निघणार असून त्यानंतर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
त्यांचे पश्चात प्रशांत विश्वनाथ लढे , सुखशांत विश्वनाथ लढे हे दोन मुलगे व अल्काबाई भीमराव पाटील ही मुलगी , सुना ,जावई , नातू , पणतू असा मोठा परिवार असून निवडणूक विभागात काम करणारे तंत्रस्नेही शिक्षक संदीप भीमराव पाटील यांचे ते आजोबा होत.




No comments:
Post a Comment