आज कोरोनाचा एक पॉझिटिव्ह रुग्ण अहवाल प्राप्त : ३० रुग्ण झाले कोरोनामुक्त, ०२ फरार, ०५ जणांचा मृत्यू ; तर आता नांदेडात ६१ रुग्ण घेताहेत उपचार ; नांदेड एकूण बाधित (सकारात्मक अहवाल) @ ९८ - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Tuesday, May 19, 2020

आज कोरोनाचा एक पॉझिटिव्ह रुग्ण अहवाल प्राप्त : ३० रुग्ण झाले कोरोनामुक्त, ०२ फरार, ०५ जणांचा मृत्यू ; तर आता नांदेडात ६१ रुग्ण घेताहेत उपचार ; नांदेड एकूण बाधित (सकारात्मक अहवाल) @ ९८


नांदेड : आज  मंगळवार ( दिनांक १९/०५/२०२० रोजी ) सकाळी अकरा वाजेपर्यंत कोरोना विषाणु संदर्भात एक रूग्ण अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी दिली.
       जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने दिलेल्या माहितीनुसार दिनांक १७/०५/२०२० ते दिनांक १९/०५/२०२० रोजी पाठविण्यात आलेल्या १८२ स्वॅब अहवाल प्रलंबित होते. त्यापैकी २८ स्वॅबचा अहवाल प्राप्त झालेला आहे . त्यामध्ये एक रुग्ण  पॉझीटीव्ह आढळून आला. कोरोनाबाधित रुग्ण करबला भागातील पुरुष ( वय ६० वर्षे ) आहे. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील पॉझीटीव्ह अहवालाची  संख्या ९८ झाली असली तरी ३० रुग्णांना कोरोना मुक्त झाल्याने सुटी देण्यात आली. ०२ रूग्ण फरार आहेत.०५ जणांचा मृत्यू झाला असून  आता नांदेडात एकूण रुग्ण ६१ आहेत. 
            एकूण ९८ रुग्णांपैकी ३० रुग्ण हे बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. ६१ रुग्णांपैकी १० रुग्ण हे डॉ . शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय , नांदेड , पंजाब भवन कोवीड केअर सेंटर व यात्री निवास कोवीड केअर सेंटर येथे ४९ रुग्ण व ग्रामीण रुग्णालय बारड येथील धर्मशाळा कोवीड केअर सेंटर मध्ये २ रुग्ण असून सर्व रुग्णांवर औषध उपचार सुरु आहे . औषधोपचारास प्रतिसाद न दिल्यामुळे एकूण पाच रुग्णांचा मृत्यु झाला असून मृत्यु पावलेले रुग्ण हे रक्तदाब , मधुमेह या आजाराने बाधित होते .  त्यामुळे सदर आजाराने बाधित रुग्णांनी विशेष काळजी घेण्याची अवाहान करण्यात येत आहे . तरी जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भीती बाळगु नये आणि अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये आणि प्रशासनास सहकार्य करावे . तसेच सर्व जनतेने आपल्या मोबाईलवर “ आरोग्य सेतू ऍप ” डाऊनलोड करुन घ्यावे जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास सदरील ऍप सतर्क करण्यास मदत करते. असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी सांगितले.


No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News