आता नवीन आठ कोरोना रुग्ण ; यात चार वर्षाचा एक बालक : एकूण सकारात्मक अहवालाचे शतक पार @ 106 ; आतापर्यंत 2 हजार 464 अहवाल निगेटिव्ह - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Tuesday, May 19, 2020

आता नवीन आठ कोरोना रुग्ण ; यात चार वर्षाचा एक बालक : एकूण सकारात्मक अहवालाचे शतक पार @ 106 ; आतापर्यंत 2 हजार 464 अहवाल निगेटिव्ह


  

नांदेड :  शहरातील करबला भागात एक नवीन रुग्ण आढळला होता. आता आणखी आठ नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यात सहा पुरुष ( वय 55, 41, 25, 34, 04, 54 वर्षे ) व दोन महिला ( वय 28 व 50 वर्षे ) यांचा समावेश आहे. त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेणे चालू आहे.
               आतापर्यंत एकुण प्रवासी व प्रत्यक्ष सर्वेक्षणाद्वारे 1 लाख 22 हजार 57 व्यक्तींची तपासणी करण्यात आलेली असून एकुण 2 हजार 730 रुग्णांचे स्वॅब घेण्यात आले आहे. त्यापैकी 2 हजार 464 स्वॅब तपासणीचा अहवाल निगेटिव्ह आलेला आहे. आज मंगळवारी (दि. 19 ) रोजी रात्री 11 वाजता 137 स्वॅबचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. 124 अहवाल निगेटिव्ह तर आठ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. पाच अहवाल अनिर्णित आहेत. त्यामुळे आजपर्यंत घेतलेल्या एकुण स्वॅब पैकी 106 तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत.
              आतापर्यंत एकुण 106 पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 5 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. तर 30 रुग्ण हे बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. 
              69 रुग्णांपैकी 18 रुग्ण हे डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय नांदेड येथे तर पंजाब भवन कोवीड केअर सेंटर व यात्री निवास कोवीड केअर सेंटर येथे 49 रुग्ण आणि बारड ग्रामीण रुग्णालय येथील धर्मशाळेत कोवीड केअर सेंटरमध्ये 2 रुग्णांवर औषधोपचार सुरु असून त्यांची प्रकृती सद्य:स्थितीत स्थिर आहे.
                जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती बाळगू नये आणि अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये आणि प्रशासनास सहकार्य करावे. तसेच आपल्या मोबाईलमध्ये “आरोग्य सेतू ॲप” डाऊनलोड करुन घ्यावा, जेणेकरुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास या ॲपद्वारे सतर्क राहण्यास मदत मिळेल, असेही आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.

कोरोना विषाणू संसर्गाबाबत नांदेड जिल्ह्यातील माहिती
दि: 19/05/2020 वेळ 11.00 PM

• आत्तापर्यंत एकूण संशयित - 2720
• एकूण क्वारंटाईन व्यक्तींची संख्या-2487
• क्वारंटाईन कालावधी पूर्ण - 1072
• अजून निरीक्षणाखाली असलेले - 198
• पैकी दवाखान्यात क्वारंटाईनमध्ये -57
• घरीच क्वारंटाईनमध्ये असलेले -2430
• एकुण नमुने तपासणी- 2867
• एकुण पॉझिटीव्ह रुग्ण- 106
• पैकी निगेटीव्ह - 2464
• नमुने तपासणी अहवाल बाकी- 188
• नाकारण्यात आलेले नमुने - 14
• अनिर्णित अहवाल – 110
• कोरोना बाधित रुग्णांची मृत्यू संख्या – 5
• जिल्ह्यात  बाहेरून आलेले एकूण प्रवासी 122057 राहण्याचा सल्ला दिलेला आहे. तसेच त्यांच्या हातावर शिक्केही मारण्यात आले आहेत


No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News