मुलाच्या वाढदिवसानिमित्‍त मुख्यमंत्री सहाय्यता निधीस ढगे परिवाराची मदत - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Tuesday, May 19, 2020

मुलाच्या वाढदिवसानिमित्‍त मुख्यमंत्री सहाय्यता निधीस ढगे परिवाराची मदत



 नांदेड : सद्या सर्वत्र कोरोना महामारीमुळे राज्‍य अडचणीत आले आहे. नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अशोकराव चव्हाण व जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी मुख्‍यमंत्री सहाय्यता निधीस मदत करण्‍याचे आवाहन केले होते.

    या आवाहनास प्रतिसाद देत उपक्रमशील शिक्षक  तथा  युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवी ढगे यांनी आपल्या मुलाच्‍या (अर्णव) वाढदिवसावर होणारा खर्च कमी करुन वाढदिवस साध्‍या पध्दतीने साजरा केला. वाढदिवसानिमित्‍त त्‍यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस पाच हजार रुपयाची मदत दिली आहे. जिल्‍हाधिकारी डॉ. विपीन यांना आज पाच हजार रुपयांचा धनादेश दिला आहे. यावेळी सेवानिवृत्त पर्यवेक्षक बालाजी ढगे उपस्थित होते. मुलाच्‍या वाढदिवसानिमित्‍त मुख्‍यमत्री सहाय्यता निधीस मदत करुन त्यांनी चांगला संदेश समाजाला दिला आहे, त्यामुळे त्‍यांचे सर्वत्र  कौतुक होत आहे.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News