राज्यात आतापर्यंत 52 हजार उद्योग सरू -सुभाष देसाई - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Wednesday, May 20, 2020

राज्यात आतापर्यंत 52 हजार उद्योग सरू -सुभाष देसाई


मुंबई : सध्या कोरोनामुक्त झालेल्या ग्रीन झोनमध्ये पूर्ण क्षमतेने उद्योग सुरू झाले आहेत. आतापर्यंत 70 हजार परवाने दिले असून त्यापैकी 52 हजारांहून अधिक कारखाने सुरू झाले आहेत. यात साडेबारा लाख कामगार रुजू झाले आहेत. याशिवाय रेड झोनमधील अत्यावश्यक सेवा, निर्यात प्रधान उद्योग, संरक्षण दलासाठी लागणारे साहित्य- सामुग्री, सुटे भाग निर्मिती करणारे कारखाने, सिप्झ, डायमंड आदी क्षेत्रातील उद्योगांना उत्पादनासाठी परवानगी दिलेली आहे. परंतु रेड झोनमधील इतर उद्योगांवरील निर्बंध कायम ठेवले जाणार आहेत. अशाप्रकारे  औद्योगिकदृष्ट्या राज्य सावरत असताना सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज येथे केले.

             वॉटर बॉटल असोशिएनच्यावतीने आयोजित वेबिनारमध्ये श्री. देसाई बोलत होते.                          यावेळी संघटनेचे राज्यभरातील पदाधिकारी सहभागी उपस्थित होते. केंद्र शासनाने जाहीर केलेल्या पॅकेजमधून लघु, मध्यम उद्योगांना विनातारण कर्ज, पीएफमध्ये दिलासा देण्यात आला आहे. या पॅकेजचा लघु उद्योजकांनी लाभ घ्यावा. राज्य सरकार देखील लघु उद्योगांना सवलती देत आहे. विजेचे स्थिरदर रद्द करून जेवढा वापर होईल तेवढे दर आकारले जात आहेत. वॉटर बॉटल संघटनने देखील केंद्राच्या या                                   पॅकेजचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. दसाई यांनी केले. पाणी उद्योगांचा दर्जा टिकवून वॉटर बॉटल संघटनेने आपली प्रतिमा अधिक शुद्ध व तेजस्वी करावी. केवळ पाणी उद्योगावर विसंबून न राहता इतर जोड उद्योग सुरू करावेत, असे आवाहन श्री. देसाई यांनी केले.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News