एस.आय.आर. पुर्वतयारी मोहीम अंतर्गत मतदार मॅपिंग टक्केवारी वाढविणे बाबत किनवटच्या उप विभागीय अधिकारी कार्यालयात बैठक संपन्न - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Saturday, March 14, 2026

एस.आय.आर. पुर्वतयारी मोहीम अंतर्गत मतदार मॅपिंग टक्केवारी वाढविणे बाबत किनवटच्या उप विभागीय अधिकारी कार्यालयात बैठक संपन्न



किनवट : 83 किनवट विधानसभा मतदारसंघाच्या आगामी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (Special Intensive Revision S.I.R.) कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर, मतदार यादीतील त्रुटी दूर करून ती निर्दोष करण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, नांदेड यांच्या सूचनेनुसार किनवट उपविभागीय अधिकारी कार्यालयात दि. १३.०३.२०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता सहायक जिल्हाधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी  उप विभाग, किनवट यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीस तहसीलदार (किनवट) डॉ. शारदा चौंडेकर  व तहसीलदार (माहूर) अभिजीत जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच लोकप्रतिनिधी म्हणून नगराध्यक्ष (किनवट) सुजाता एंड्रलवार नगराध्यक्ष (माहूर) फिरोज दोसाणी  तसेच  किनवट व माहूरचे नगरसेवक आणि विविध राजकीय पक्षांचे तालुका अध्यक्ष उपस्थित होते.


या बैठकीत मतदार यादीचे विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (Special Intensive Revision - S.I.R.) कार्यक्रमाच्या विविध टप्प्याची माहिती देण्यात आली आहे.


मतदार मॅपिंग (Mapping) सध्याच्या मतदार यादीतील मतदारांचे, सन २००२ च्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षणाच्या अंतिम यादीतील मतदारांशी मॅपिंग करणे.


समान नौदींची (DSE) पडताळणीः मतदार यादीत एकाच मतदाराच्या नावाशी साधम्र्य असलेल्या 'डेमोग्राफिक सिमिलर एन्ट्रीज' (DSE) शोधून, नियमानुसार पडताळणी करून दुबार नावे वगळणे.


मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरणः आगामी पुनरीक्षणाच्या दृष्टीने मतदान केंद्रांची पुनर्रचना आणि सुसूत्रीकरण करण्याबाबत सूचना देण्यात आल्या.


अस्पष्ट व मानवेतर फोटोंचे शुद्धीकरणः मतदार यादीमध्ये असलेले अस्पष्ट (Blurred), आकार विरहित (Non-dimensional) आणि मानवी नसलेले (Non-human) फोटो शोधून त्यांची पडताळणी करणे व अशा नोंदी वगळण्याची कार्यवाही करणे.


८३-किनवट विधानसभा मतदार संघाची एकूण मतदार संख्या २,८३,३१७ असून मतदार मॅपिंगचे काम १,६१,२२२ इतके झाले असून त्याची टक्केवारी ५६.९१ इतकी आहे. मतदाराचे मॅपिंग (Mapping) ९०-९५ टक्के काम पूर्ण करणे आहे.


या मोहिमेमुळे मतदार यादी अधिक अचूक आणि पारदर्शक होणार आहे. नागरिकांनीही या प्रक्रियेत सहकार्य करावे आणि सध्याच्या मतदार यादीतील मतदारांचे, सन २००२ च्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षणाच्या अंतिम यादीतील मतदारांशी मॅपिंग करणे तसेच नावातील किंवा फोटोतील त्रुटी असल्यास संबंधित केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्याशी संपर्क साधावा असे सांगण्यात आले. किनवट आणि माहूर येथील नगर सेवक व राजकीय पक्षाचे तालुका अध्यक्ष यांनी आपल्या B.LA मार्फत जनतेशी संपर्क साधावा तसेच किनवट शहरामध्ये शनिवार आणि रविवार या दिवशी वार्ड निहाय विशेष कॅम्प चे आयोजन करण्यात आले आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना आणि लोकप्रतिनिधींना या मोहिमेत सक्रिय सहभाग घेऊन प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News