आदिवासी दुर्गम भागातील आरोग्य केंद्रांमध्ये कंत्राटी आरोग्य सेविका पदे भरणार... आमदार भीमराव केराम यांच्या मागणीवर आरोग्य सचिवांची सूचना... कोरोना काळात काम केलेल्या बेरोजगार जीएनएम,एएनएम विद्यार्थिनींना प्रधान्य.. - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Saturday, January 23, 2021

आदिवासी दुर्गम भागातील आरोग्य केंद्रांमध्ये कंत्राटी आरोग्य सेविका पदे भरणार... आमदार भीमराव केराम यांच्या मागणीवर आरोग्य सचिवांची सूचना... कोरोना काळात काम केलेल्या बेरोजगार जीएनएम,एएनएम विद्यार्थिनींना प्रधान्य..

 



किनवट : नांदेड जिल्ह्यातील आदिवासी बहुल,अतिदुर्गम, डोंगराळ किनवट,माहूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांमध्ये अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करण्याच्या दृष्टिकोनातून विशेष बाब म्हणून जीएनएम,एएनएम आरोग्य सेविकांची भरती करण्याची व त्यात कोरोना काळात सेवा बजावणाऱ्या आरोग्य सेविकांना प्राधान्यक्रम देण्याची मागणी आमदार केराम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती.त्या मागणीच्या अनुषंगाने राज्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाचे अवर सचिव मिलिंद कुलकर्णी यांनी आयुक्त,आरोग्य सेवा तथा अभियान संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई यांना अवगत केले आहे.लवकरच या भरती प्रक्रियेची अधिसूचना निघणार असल्याची माहिती आमदार भीमराव केराम यांनी दिली.


                माहूर आणि किनवट प्राथमिक आरोग्य केंद्र व आरोग्य उपकेंद्रात आरोग्य सेविका कर्मचारी यांच्या रिक्त पदांचा अनुशेष कायम असल्या कारणाने आदिवासी दुर्गम डोंगराळ भागात सर्वसामान्य रुग्णांना आरोग्य सुविधा मिळणे दुरापास्त झाले असून यावर आदिवासी उपयोजना क्षेत्रासाठी विशेष बाब म्हणून जीएनएम, एएनएम या आरोग्य सेवकांची कंत्राटी पद्धतीने पद भरती प्रक्रिया राबऊन त्यात कोरोना काळात सेवा बजावणाऱ्या आरोग्य सेविकांना प्राधान्यक्रम देण्याची मागणी आमदार केराम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. त्या मागणीच्या अनुषंगाने राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे अवर सचिव मिलिंद कुलकर्णी यांनी आयुक्त आरोग्य सेवा तथा अभियान संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई यांना आमदार केराम यांच्या मागणी वजा पत्राचा संदर्भ घेऊन आवश्यक कार्यवाही करण्याचे सुचित केले आहे. तशा स्वरूपाचे पत्र आमदार भीमराव केराम यांना प्राप्त झाले आहे. आमदार केराम यांच्या पत्राची दखल घेऊन आरोग्य विभाग कंत्राटी पद भरती करणार असल्याची विश्वसनीय माहिती हाती आली असून लवकरच ही भरती प्रक्रिया राबविली जाणार असल्याची माहिती आमदार भीमराव केराम यांनी दिली आहे. यावरून जीएनएम,एएनएम चे अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या सुशिक्षित बेरोजगार तरुणींना आमदार भीमराव केराम यांनी रोजगाराची संधी निर्माण करून दिली असून कोरोना काळात सेवा बजावणाऱ्या आरोग्य सेविकांना देखील प्राधान्यक्रम देण्याची मागणी असल्याने त्यांनी कोरोना काळात बजावलेल्या सेवेचा लाभ त्यांना मिळणार आहे.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News