प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने हर घर तिरंगा अंतर्गत रॅलीचे आयोजन - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Saturday, August 6, 2022

प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने हर घर तिरंगा अंतर्गत रॅलीचे आयोजन

 

 


नांदेड (जिमाका)  : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा अंतर्गत प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने भव्य मोटार सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या मोटार सायकल रॅलीच्या वेळी रस्ता सुरक्षेचे महत्व नागरिकांना कळावे म्हणून सुरक्षित वाहतुकीचे महत्व पटवून देणारे स्लोगनचे बॅनर लावण्यात आले होते. या मोटार सायकल रॅलीला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी  वर्षा ठाकूर-घुगे यांनी हिरवा झेंडी दाखवुन रॅलीला मार्गस्थ केले.

 

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर, पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे, प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत, सहा.प्रादेशिक परिवहन अधिकारी संदिप निमसे यांची उपस्थिती होती. या मोटार सायकल रॅलीचे मार्गक्रमण जिल्हाधिकारी कार्यालय पासून पोलीस अधिक्षक कार्यालय, वजिराबाद, शिवाजी नगर, आयटीआय, तरोडा नाका, फरांदे मोटार्स नांदेड येथे रॅलीचा समारोप करण्यात आला.

 

या मोटार सायकल रॅलीमध्ये जिल्ह्यातील मोटार वाहन वितरकामध्ये फरांदे मोटार्सचे कौस्तुभ फरांदे, राईडवेल मोटर्सचे कमल कोठारी, एमएफ मोटार्सचे अब्दुल वहिद, जिल्हयातील सर्व वाहन वितरक व त्यांचे कर्मचारी यांनी उर्स्फूतपणे सहभाग घेतला.

 


यावेळी कार्यालयातील कार्यकारी अधिकारी, मोटार वाहन निरीक्षक रत्नकांत ढोबळे, अमोल अवाड, गणेश तपकिरे, सहा. मोटार वाहन निरीक्षक पंकज यादव, अडकलवार, डुब्बेवार, श्री. रहाणे, श्री. टिळेकर, श्री. राठोड, श्री. जावळे, श्री.कंतेवार, श्री. राजुरकर, श्री. पानकर, श्री. गायकवाड, श्री ठाकुर, श्री सोमदे, श्रीम.कलाले, तसेच लिपिक कर्मचारी श्री, गाजुलवाड, श्री. केंद्रे, श्री. कंधारकर, श्री. शिंदे, श्री. पवळे, श्री. देवदे, श्री. काकडे, श्री.कुंडगीर, श्री.सातपुते, श्री. बुरुकुले, व असंख्य नागरिक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News