किनवट : येथे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय न दिल्यास किनवट/ माहूर तालुका तेलंगणात जाणार असे निवेदन उप विभागीय अधिकारी किनवट यांच्या मार्फत महाराष्ट्र शासनास दिल्या नंतर शासन आता काय निर्णय घेईल ही बाब सर्वात महत्वाची असताना मंगळवारी (ता. 20 ) भारतीय राष्ट्र समितीचे माजी खासदार यांनी अभिवक्ता संघास भेट देऊन हितगुज केले.
नवोदित वकिलास तेलंगाना राज्यात विकासात्मक योजना आहेत त्या महाराष्ट्रात सुधा सुरू होतील व तेलंगानाराज्या प्रमाणे शेतकऱ्यांचा विकास साधण्यासाठी आमचा पक्ष कटिबध्द आहे असे प्रतिपादन त्यांनी केले.
सदर पक्ष महाराष्ट्रात कसा अजेंडा राबवेल ? असेऍड. विलास शामीले (सुर्यवंशी) यांनी विचारले असता माजी खासदार यांनी आम्ही शेतकरी शेतमजूर यांच्या विकासासाठी कटिबध्द आहोत असे सांगितले. आमचे शासन तेलंगणात विकास करून तेलंगाना पॅटर्न आमच्यासाठी चांगली बाब आहे. महाराष्ट्रात विकास करणे हे इतर राज्यांच्या तुलनेत अधिक सुकर आहे असे ते म्हणाले.
अभिवाक्ता संघाचे उपाध्यक्ष ॲड कुरेशी यांनी किनवट - माहूर तालुक्यातील ग्रामीण भागातील परिस्थिती विषयी खासदार यांना अनेक प्रश्न विचारून अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय उभारण्यासाठी प्रयत्न करावे असे म्हणाले. त्यावर माजी खासदारांनी तेलंगाना राज्याचे मुख्मंत्री यांना भेटून विनंती तथा सूचना करावी असे सूचित केले. तसेच लवकरच तेलंगाना राज्याचे मुख्यमंत्री हे अभिवक्ता संघाच्या भेटीसाठी येतील असेही ते म्हणाले.
यावेळी अभिवक्ता संघाचे सचिव ऍड. पंकज गावंडे , ऍड. सुभाष ताजने , ऍड. एस. डी. राठोड, ऍड, उदय चव्हाण, ऍड. वैद्य, ऍड. किशोर मुनेश्र्वर , ऍड. सुनिल येरेकर, ऍड. टेकसिंघ चव्हाण , ऍड.
कृष्णा राठोड , ऍड.सोनकांबळे , ऍड. .नयन मूनेश्र्वर , ऍड. काळे, ऍड, सर्पे, ऍड. पुरुषोत्तमवार इत्यादी उपस्थित होते.




No comments:
Post a Comment