अकोला : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संस्थापक अध्यक्ष असलेल्या दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा यांच्या वतीने घेण्यात आलेल्या बौद्धाचार्य परिक्षेत प्रा. डॉ. उत्तम नागोराव शेंडे हे राज्यातून प्रथम आल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
ता. ३० ऑक्टोंबर २०२२ रोजी संपूर्ण देशात बौद्धाचार्य परीक्षा घेण्यात आली होती. तसेच महाराष्ट्रात वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा ही परीक्षा आयोजित करण्यात आलेली होती. या परीक्षेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामधून ५९६ उपासक (माजी श्रामणेर ) बसले होते. या परीक्षेचा निकाल नुकताच लागला. मध्ये नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यात आसलेल्या सायफळ येथील भूमिपुत्र असलेले आणि सध्या
यवतमाळ जिल्ह्यातील घाटांजी तालुक्यात कार्यरत असलेले प्रा. डॉ. उत्तम नागोराव शेंडे हे अकोला परीक्षा केंद्रावर या परिक्षेस बसले होते. त्यांनी २०० गुणापैकी १७२ गुण प्राप्त करून महाराष्ट्र राज्यातून पहिला क्रमांक मिळविला आहे.
या भरीव यशाबद्दल त्यांचे सर्व महाराष्ट्रभर अभिनंदन होत आहे. भारतीय बौद्ध महासभेचे माजी यवतमाळजिल्हाध्यक्ष भगवानज इंगळे, किनवट तालुकाध्यक्ष अभियंता प्रशांत ठमके आदींसह बहुसंख्य समाज बांधवांनी त्यांचे अभिनंदन केले.




No comments:
Post a Comment